Tarun Bharat

कोल्हापूर : सुतगिरणी आधिकार्‍याचा अचानक मृत्यू, स्वॅब तपासणीच्या अहवालाची प्रतिक्षा

प्रतिनिधी / आळते

हातकणंगले तालुक्यातील एका नामांकित सूतगिरणीच्या प्रॉडक्शन मॅनेजर यांचा आज पहाटे तीन वाजता अचानक मृत्यू झाला. मागील तीन दिवसापासुन त्यांना खोकला व ताप होता. काल रात्री अकरा वाजता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कोल्हापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून त्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.

प्रॉडक्शन मॅनेजर शुक्रवारी सूत गिरणी मधील जवळपास तीस ते पस्तीस लोकांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते. यामध्ये सुतगिरणीचे कार्यकारी संचालक, व्हाईस चेअरमन व ऑफिस स्टाफ यांचा समावेश आहे. त्यांचा अहवाल येईपर्यंत या सर्वांना होमक्वांरटाईन होण्याच्या सूचना दिले असल्याचे समजते. मृत झालेल्या कोरोना व्यक्तीचा चाचणी अहवाल येण्याअगोदरच संपूर्ण सूतगिरणी परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले झाले आहे.

Related Stories

VIDEO-कोल्हापूर:दूधगंगा उजव्या कालव्याला भगदाड

Rahul Gadkar

महिन्याअखेरला चित्रनगरीत लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन…

Archana Banage

शाळकरी मुलावर अत्याचार करणाऱ्या 27 वर्षीय महिलेला 20 वर्षांचा तुरुंगवास

Archana Banage

‘जरंडेश्वर’चा नेमका मालक कोण ?

Patil_p

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते”

Archana Banage

हुपरीतील जैन मूर्ती लेखातून उलगडणार प्राचीन इतिहास

Archana Banage