Tarun Bharat

कोल्हापूर : स्मशानभूमींना ६० टन ब्रिकेटस् दान

शहरातील जाणकारांचा पुढाकार : शेणी, ब्रिकेटस्च्या सहाय्याने अडीच हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येणार

संग्राम काटकर / कोल्हापूर

मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी बायोमास ब्रिकेटस्चा (मोक्षकाष्ट) वापर केला जावा यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील जाणकारांनी पुढाकार घेतला आहे. शेणी आणि लाकडं यांना एक पर्याय म्हणून ब्रिकेटस्कडे पाहिले जावे, असे या सर्वांचे सांगणे आहे. शिवाय त्यांनी पदरमोड करून पंचगंगा स्मशानभूमीसह कसबा बावडा, कदमवाडी व बापट पॅम्पमधील स्मशानभूमीला तब्बल 60 टन पर्यावरणपूरक ब्रिकेटस् अंत्यसंस्कारासाठी दिले आहेत. लाकूड-शेणीसोबत 30 किलो ब्रिकेटस्चा वापर केल्यास तब्बल अडीच हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येणार आहेत. आता लवकरच आणखी 40 टन ब्रिकेटस् स्मशानभूमींना दिले जाणार आहेत. 

किणी-वाठार, बत्तीस शिराळा, इस्लामपूर येथील पॅक्टरींमध्ये हे ब्रिकेटस् बनविले जाते. त्याच्या निर्मितीसाठी शेतातील उसाचा पाला, पाचट, सोयाबीन, कापूस आणि सूर्यफुलाच्या दांड्या, भुईमूगाची टरफलं, झाडांचा पाला-पोचाळ्याचा वापर केला जातो. गोल ठोकळ्याच्या आकारात ब्रिकेटस् बनवले जातात. याची ज्वलनशीलता ही लाकडाच्या दुप्पट आहे. उद्योग क्षेत्रात बॉयलर पेटविण्यासाठी लाडकाला पर्याय म्हणून ब्रिकेटस्कडे पाहिले जाते. अशा या ब्रिकेटस्चा वापर अंत्यसंस्कारासाठी व्हावा म्हणून मंगळवार पेठेतील पर्यावरणप्रेमी प्रशांत मंडलिक यांनी महापालिका पातळीवर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यांनीच कोल्हापूर जिल्हा टू-व्हिलर मेपॅनिक एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन, न्यू इंडिया स्पोर्टस्-पेटाळा, स. म. लोहिया हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, नूतन मराठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदींच्या माध्यमातून पंचगंगा स्मशानभूमीला 18 टन ब्रिकेटस् दिले. या ब्रिकेटस्द्वारे 675 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे महापालिका आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.

मार्च महिन्यात पंचगंगा स्मशानभूमीला शेणी व लाकडाचा तुटवडा भासू लागला होता. त्यामुळे महापालिकेने शेणी, लाकूडदान करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत संस्था, मंडळे, संघटनांनी अडीच लाख शेणी, शेकडो टन लाकूडदान केले. या शेणी-लाकडाबरोबरच ब्रिकेटस्चाही अंत्यसंस्कारासाठी वापर व्हावा हे सांगण्यासाठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी पदरच्या पैशातून किणी-वाठार, बत्तीस शिराळा, इस्लामपुरातील इंडस्ट्रीजमधून 60 टन ब्रिकेटस् खरेदी करुन ते गरजेप्रमाणे पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी, बापट पॅम्पमधील स्मशानभूमीला अंत्यसंस्कारासाठी दिले आहेत. ब्रिकेटस्च्या सहाय्याने आता 2500 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आणखी 40 टन ब्रिकेटस् स्मशानभूमींना दिले जाणार असून त्यातून 1500 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येणार आहेत.  

लाकडाची मोठी बचत होईल…

निखिल ऍनालॅटीकल ऍण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडच्या तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ब्रिकेटस् जाळल्यानंतर 5 टक्केही धूर निघत नाही. ब्रिकेटस्चा सातत्याने अंत्यसंस्कारासाठी वापर केल्यास लाकडाची मोठी बचत होईल. सार्वजनिक मंडळांनी आपापल्या भागातील स्मशानभूमींना शेणीबरोबरच ब्रिकेटस् देण्याला प्राधान्य द्यावे. इंडस्ट्रीजमध्ये साडेपाच रुपये किलोने हे ब्रिकेटस मिळत आहेत.

प्रशांत मंडलिक, पर्यावरणप्रेमी

Related Stories

जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळ्याची चौकशी पूर्ण

Archana Banage

गडहिंग्लजच्या मुस्लिम समाजाचा क्रांतीकारक निर्णय

Abhijeet Khandekar

कोल्हापूर महापालिकेच्या ‘आपले बजेट’मध्ये आरोग्याची काळजी

Archana Banage

जयकृष्ण स्मृती पुरस्कार डॉ. जी. डी. यादव यांना जाहीर

Archana Banage

कोल्हापूर : ‘गंदगी मुक्त भारत’ अभियानातून गावस्तरावर राबविले जाणार स्वच्छता उपक्रम

Archana Banage

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षिस माजी सैनिक चंद्रकांत कांबळे यांचे गाव पुढा-यांना आवाहन

Archana Banage