Tarun Bharat

कोल्हापूर : हद्दवाढीशिवाय पर्याय नाही : मंत्री हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रखर टिका
ग्रामीण भागाचाही विकासकामांचे शहराप्रमाणे नियोजन झाले पाहिजे

प्रतिनिधी / कोल्हापूर

जो पर्यंत हद्दवाढ होणार नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने कोल्हापूर महापालिका ही महापालिका म्हणून यशस्वी होणार नाही. हद्दवाढीत कागल जरी घेतले तरी आपली हरकत नसेल, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला पाठींबा दर्शवला. एखादे शहर नगरपालिका पर्यंतच मर्यादीत राहणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. आर्किटेक्ट अँड इंजिनिअरींग असोसिएशनच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर विकास प्राधिकरणाची नियुक्ती नुसतीच केली आहे. त्यांच्याकडे सरकारची ऑथोरिटीही नाही आणि निधीही नाही. बांधकाम परवनागीसाठी अर्ज केला तर वर्षभर मिळत नाही. ही पद्धत बरोबर नाही. त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. कोल्हापूर शहर राज्यातील एक चांगले शहर होण्यासाठी हद्दवाढ हा एकमेव पर्याय आहे.

शहर, ग्रामिण भागाचा विचार करून नियोजन व्हावे

विकास करताना शहराच्या समस्याबरोबर ग्रामिण भागावरही लक्ष दिले पाहिजे. शहराच्या विकासाचे नियोजन करताना ग्रामिण भागातील विकासकामांचे नियोजन करावे लागणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यासाठी आर्किटेक्ट असोसिएशनने सूचना कराव्यात त्याची अंमलबजावणी करू, असेही त्यांनी सांगितले.

भराव ही मोठी समस्या

पावसाळ्यापूर्वीच अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याबाबत कर्नाटक सरकराशी चर्चा केली. त्यानुसार त्यांनीही सहकार्य केले. पुराचा धोका कमी होण्यास नक्कीच मदत झाली असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यामुळे शक्य झाले आहे. यावर्षी कमी दिवसात जास्त झालेला पाऊस पुराला जसा कारणीभूत ठरला तसा रस्ते, पुलाचे भराव कारणीभूत असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले.

गाळ, वाळू उपसा निर्णय रद्द झाला पाहिजे

ओढे, नाले नोटीफाय करू, मनरेगामधून गाळ काढू पण राष्ट्रीय हरित लवादाने नदीमधील गाळ व वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे तत्काळ हा आदेश रद्द केला पाहिजे. नद्या उथळ झाल्या असून पात्र रूंद केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कोल्हापूरला मुबलक पाऊस असून दरवर्षी धरणे भरतात. कधीही पाण्याचा तुटवडा होत नाही. पाऊस हामखास पडतो आणि आता दर दोन वर्षानी महापूरही येत असून याचा गंभिर्याने विचार करावा लागणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

बांधकाम कामगार मंडळ आटणार समुद्र

बांधकामावेळी घेण्यात येणाऱ्या 1 टक्के सेजमुळे बांधकाम कामगार मंडळाकडे 11 हजार कोटी रूपये जमा झाले आहेत. येथून पुढेही नवीन बांधकामे होत राहणार असून बांधकाम कामगार मंडळ न आटणार समुद्र आहे. यामध्यमातून बांधकाम कामगारांना सोय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कामगारांची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची नसून आता शासनाने घेतल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

 आर्किटेक्टवर शहराचे सौंदर्य आवलंबून

एखाद्या शहरामध्ये नवीन इमारती, नवीन विकास योजना होतात. शहर सुंदर दिसण्यास लागले की तेथील आर्किटेक्टना याचे श्रेय जाते. कमीत कमी जागेत चांगली इमारत उभारणचे काम ते करत असुन शहराचे सौंदर्य आर्किटेक्टवर आवलंबून असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले.

Related Stories

सादळे-मादळे घाटात बीएमडब्ल्यू मोटारीने घेतला पेट

Abhijeet Khandekar

आजर्‍यात दोन गावठी पिस्तुलसह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

पेठ वडगावात रुग्ण सापडल्याने शहर तीन दिवस लॉकडाऊन

Archana Banage

Kolhapur : कोल्हापुरातील शेंडापार्क परिसरात आढळले तोफगोळे

Abhijeet Khandekar

सातारा : जिल्ह्यातील 102 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; एका बाधिताचा आणि तीन संशयितांचा मृत्यू

Archana Banage

कबनुरात वॉलपुट्टी कामगाराचा मृत्यू

Archana Banage