वार्ताहर/पुलाची शिरोली
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वंचित आघाडीचे उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली होती. मंगळवारी दिनांक २८ जुलै रोजी या पिडीत महिलेने शिरोली एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत अत्यंत गोपनीयता ठेवत प्रसार माध्यमांपासून ही माहिती लपवली. हि महिला शिरोलीत ठमके गल्लीत एका फ्लॅटमध्ये २८ जूनला राहयला आली होती.
तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, हाजी अस्लम सय्यद आणि आपली एका कोरन्टाईन सेंटरमध्ये भेट झाली होती. त्याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी संबंध ठेवले. व ९ मे रोजी मुस्लिम रिवाजाप्रमाणे इचलकरंजी येथील मस्जिद मध्ये लग्न केले आहे. पहिल्या पतीचे निधन झालेले असल्यामुळे मीही अस्लम वर विश्वास ठेवला असे या महिलेने सांगितले. नंतर मात्र त्याने जबाबदारी झटकली. यामुळे शिरोलीत राहणार्या या महिलेला धक्का बसला. आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. हाजी अस्लम याची यापूर्वी आणखीन चार विवाह झाल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अस्लम सय्यद याला हातकणंगले लोकसभा निवडणुकीत सुमारे सव्वालाख मते मिळाली होती.


previous post