Tarun Bharat

कोल्हापूर : हुपरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

प्रतिनिधी / हुपरी

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, मुख्याधिकारी संघटना संघर्ष समिती यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील भाग सोमवार 17रोजी हुपरी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन घोषणा देत काम बंद आंदोलन केले. त्यावेळी मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी आंदोलनकर्त्याना भेटून त्यांच्या मागण्या शासनापर्यत पोच करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रामुख्याने सातवा वेतन आयोग, पगार व पेन्शनवर १०० टक्के अनुदान, अनुकंपा भरतीवरील जाचक अटी रद्द करणे, १२ व २४ वर्षीय कालबध्द पदोन्नती लागू करणे, नवनिर्मिती असलेल्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे विना अट समावेशन करावे यासह अनेक मागण्यांचे लक्ष वेधून घेणेसाठी एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात हुपरी नगरपरिषदेचे लेखापाल सचिन कांबळे, बांधकाम अभियंता जावेद मुल्ला,पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील, क्षितिज देसाई, प्रभाकर पाटील, अमित गाट, अश्विनी अडसूळ, जानबा कांबळे, प्रभाकर कांबळे, श्रद्धा गायकवाड, कार्यालय निरीक्षक रामचंद्र मुधाळे, मिरासो शिंगे उदय कांबळे, मिलिंद भोगले, तात्यासो यादव, मंगेश कांबळे, विनोद कांबळे, यांच्यासह सर्व कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.

Related Stories

केळोशी तलावाच्या गेटरूमला संतप्त प्रकल्पग्रस्तांनी ठोकले टाळे

Abhijeet Khandekar

इचलकरंजी येथील मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक

Archana Banage

Kolhapur Breaking; सख्या बहिणीचा व तिच्या नवऱ्याच्या खून प्रकरणी सख्या भावांना आजन्म कारावास

Abhijeet Khandekar

ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने घेतला अखेरचा श्वास

Abhijeet Khandekar

न्यायदेवतेवर आमचा विश्वास, धनुष्यबाण शिवसेनेकडचं राहणार- संजय पवार

Abhijeet Khandekar

जानेवारी पेड इन फेब्रुवारी !; महापलिका कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू

Archana Banage