वार्ताहर / हेरले
हेरले ता. हातकणंगले येथील गावभाग फाट्या जवळील वाहनधारकांच्या मृत्युला आमंत्रण देणाऱ्या तुटलेल्या पुलाच्या कठडा दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने कोल्हापूर सांगली महामार्गावरील वाहनधारकांनातुन संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर सांगली या महामार्गावर हेरले गावभाग फाट्याजवळील पुलाचा कठडा अपघाताने तुटला आहे. या तुटलेल्या पुलाच्या कठड्यामुळे महामार्गावर मोठा धोका निर्माण झाला आहे. या पुलाजवळील रस्ता वळणाचा आहे.
या महामार्गावरून दररोज हजारो वाहनधारक प्रवास करत असून गेल्या काही महिन्यात अनेक दुचाकीस्वार रस्त्याचा अंदाज न आल्याने या तुटलेल्या पुलावरून पडून जखमी झाले आहेत.केवळ नशीब बलवत्तर म्हणून हे दुचाकीस्वार बचावले आहेत. या तुटलेल्या पुलावरून खाली पडून अनेक अपघात घडून ही बांधकाम विभागाने गांधारीचे सोंग घेतले आहे.सद्या या पुलावर सर्वत्र गवत उगवले असून पावसाळ्यात येथे जास्त धोका निर्माण झालाआहे. एकाद्या वाहनधारकाचा मृत्यू झाल्यावरच बांधकाम खाते डोळे उघडणार काय असा संतप्त सवाल वाहनधारकांतुन व्यक्त होत आहे.
मुनीर जमादार, सरचिटणीस हातकणंगले स्वाभिमानी शेतकरी संघटना- सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या धोकादायक पुलाची दुरुस्ती करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


previous post