Tarun Bharat

कोल इंडियाची 32 खाण प्रकल्पांना मंजुरी

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारी कोळसा कंपनी कोल इंडियाच्या (सीआयएल) संचालक मंडळाने चालू आर्थिक वर्षामध्ये जानेवारीपर्यंत कोळसा उत्खननच्या 32 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. कंपनी 2023-24 पर्यंत एक अब्ज टन कोळशाची उत्पादन क्षमता प्राप्त करण्यासाठी खाण प्रकल्पांमध्ये जवळपास 47,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. सदरच्या 32 प्रकल्पांमधील 24 खाणींचा विस्तार करण्यात येणार आहे. तर अन्य 8 खाणी नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये कोळसा उत्पादन क्षमतेत 19.3 कोटी टन वर्षाला वाढ होण्याचा अंदाज आहे. कोळशाचीही उत्पादन क्षमता 30.35 कोटी टन इतकी अतिरिक्त मंजूर करण्याची मर्यादा असल्याची माहिती आहे.

वर्षाला 19.3 कोटी टन क्षमता असणाऱया 32 प्रकल्पांमध्ये 16.7 कोटी टन म्हणजे 86.5 टक्क्यांचा वाटा कोल इंडियाच्या तीन सब्सिडियरी साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लि(एसइसीएल), सेंट्रल कोलफील्ड्स लि(सीसीएल) आणि महानदी कोलफील्ड्स लिमटेड या उचलणार आहेत.

नवीन खाणींमधून 8.1 टनकोळसा मिळणार

कोल इंडिया आणि त्यांच्या सहयोगी कंपन्या यांच्या संचालक मंडळाने उत्पादनांमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. नवीन खाण उत्पादन सुरु झाल्यावर येणाऱया 2023-24 पर्यंत 8.1 कोटी टन वर्षाला कोळसा उत्पादनास प्रारंभ होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. कंपनी जितका कोळसा आयात करत आहे, तेवढेच उत्पादन देशामध्ये वाढविण्यावर भर देण्यास यामुळे मदत होणार असल्याची माहिती आह

Related Stories

जेएसडब्ल्यू स्टीलला 5 हजार कोटींचा नफा

Patil_p

सन फार्माचा निव्वळ नफा 70 टक्क्यांनी वाढला

Omkar B

आयसीआयसीआय प्रुडेन्शीयलची 982 कोटींची कोरोना विमा पूर्ती

Patil_p

विमान वाहतूक 60 टक्केपर्यंत पोहचली

Patil_p

डेलिव्हरी 15 जिल्हय़ांमध्ये देणार नवी सेवा

Patil_p

एडीक्युची बायजूमध्ये गुंतवणूक

Patil_p
error: Content is protected !!