Tarun Bharat

कोळशाचे कण गोव्याच्या समुद्रकिनाऱयावर

मच्छीमारी, पर्यटन व्यवसायिकांत भीती

प्रतिनिधी / मडगाव

कोळशाचे कण असल्याचा संशय असलेली काळी पावडर सद्या गोव्याच्या समुद्रकिनाऱयावर आढळून येऊ लागली आहे. समुद्रातून ही काळी पावडर किनारपट्टीवर पोचली असून स्थानिक मच्छीमारांनी भीती व्यक्त केली आहे. पर्यावरणप्रेमी क्लाऊड आल्वारीस यांनी मुरगांव बंदरात कोळसा आयात करताना ती समुद्रात टाकली असावी अशी शक्यता व्यक्त केली आहे.

कोळशाच्या कणांची दोन स्वतंत्र उदाहरण आढळली आहेत. दक्षिण गोव्यामध्ये मच्छीमार आणि जल क्रीडा चालकांना बाणावली समुद्रकिनाऱयालगत तसेच उत्तर गोव्यात केरी समुद्रकिनाऱयावर पर्यावरणप्रेमी क्लाऊड आल्वारीस यांना कोळशासारखे काळे घन असलेले कोळशाचे अंश सापडले आहे. दरवर्षी पावसाळय़ानंतर समुद्रकिनाऱयावर डांबराचे गोळे कसे आढळून येत होते. परंतु, यंदा कोळशाचे कण सदृष्य़ पावडर आढळून आली आहे.

वेगळय़ा प्रकारची काळी पावडर : फर्नांडिस

बाणावली समुद्रकिनाऱयावरील मच्छीमार आणि वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर, पेले फर्नांडिस यांनी सांगितले की, आम्हाला समुद्रकिऱयावर प्रथमच डांबरच्या गोळय़ापेक्षा वेगळय़ा प्रकारची काळी पावडर समुद्रकिनाऱयावर आढळून आली आहे. ते पुढे म्हणाले की, काही पर्यटकांनी समुद्रकिनाऱयावर आलेली काळी पावडर नेमकी काय प्रकार अशी विचारणा आपल्याकडे केली. ती कोळशाची पावडर असावी अशी शक्यता आपण व्यक्ती केली तरी आपण ठोस काही सांगू शकत नाही. जर या पर्यटकांनी एकदा समुद्रकिनाऱयाकडे पाठ फिरविली तर ते पुन्हा येणार नसल्याची भीती आपल्या मनात होती.

 या संदर्भात बोलताना, गोवा फाउंडेशनचे संचालक क्लाऊड आल्वारीस म्हणाले की, गोव्याच्या समुद्रकिनारी कोळसा धुण्याचे काम ‘फक्त एमपीटी करते आणि येथे लोडिंग व अनलोडिंग ऑपरेशन केले जाते. ते फारच प्राथमिक अवस्थेत आहे.’

 गोव्यात रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध केला जात आहे. सर्व थरांतून तीव्र निषेध होत असतानाच ही बातमी समोर आली आहे. मुरगांव बंदरात इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथून सुमारे 12 ते 14 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा आयात केला जातो. जो आत्ता कमी झालेला आहे आणि यावषी तो सुमारे 9 ते 10 दशलक्ष मेट्रिक टन कोळशाची आयात झालेली आहे. कोळसा खुल्या हवेत जहाजे व मालवाहू जहाजातून उतरविला जातो आणि वास्कोच्या आसपास वाऱयामुळे समुद्रात कोळशाची धूळ वाहून जाऊ दिली जाते.

याआधी, 2019 मध्ये आयआयटी-खडगपूर आणि गोव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी या संशोधकांनी गोव्याच्या पाण्यामध्ये मवुमर्यरी उपस्थितीचा अभ्यास करताना संशोधकांना ‘मांडवी नदीच्या किनारपट्टीवर गडद काळी पावडर’ सापडली होती. या काळय़ा पावडरमध्ये मक्gर्यरीचे प्रमाण प्रति किलो 200.5 मायक्रोग्राम असल्याचे आढळले होते. संशोधकांनी म्हटले होते की, मांडवीच्या पाण्यातील मक्gर्यरीचे प्रमाण जास्त आहे, जे मुरगांव बंदारात प्राप्त झालेल्या कोळशाच्या मर्क्यरी एकाग्रतेसारखे होते.

‘काळय़ा पावडरचे शारीरिक स्वरूप कोळशाच्या बारिक कणांसारखेच दिसत होते. या काळय़ा पावडरचे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपवर केले तर ही पावडर कोळशाचीच असल्याचे संकेत मिळत आहे. तथापि, एचजीच्या उच्च एकाग्रतेशी संबंधित या बारिक काळय़ा कणाचे स्त्राsत ओळखण्यासाठी पुढील तपासणी करणे आवश्यक आहे,’ असे अभ्यासानुसार नमूद केले आहे.

Related Stories

मडगावच्या रोशना वेर्णेकर यांना ‘न्यूयॉर्क’ मध्ये पुरस्कार

Amit Kulkarni

नागरिकत्व मुद्यावरुन पणजी काँग्रेस पदाधिकाऱयांचा पक्षाला रामराम

Patil_p

पेडणे येथील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करुया

Amit Kulkarni

पावसाळी आव्हानांसाठी वाळपई अग्निशामकची यंत्रणा सज्ज

Amit Kulkarni

इंग्लंड-गोवा विमाने रद्द

Patil_p

मगो-तृणमूल युतीमुळे राजकीय परिवर्तन निश्चित

Patil_p