Tarun Bharat

कोळसा उत्पादनाचे ध्येय कायम ठेवा

कोळसा मंत्रालयाकडून कोल इंडियाला आदेश: 1 अब्जचे लक्ष्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोळसा मंत्रालयाने कोल इंडिया लिमिटेड या कंपनीला 2024 पर्यंत एक अब्ज डॉलरचे कोळसा उत्पादनाचे ध्येय सिद्ध करण्याची योजना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चालू आर्थिक वर्षातील उत्पादनाचे ध्येय 71 कोटी टन कायम ठेवण्यात यावे असेही कोळसा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 

त्याप्रमाणे योग्य योजना आखून उत्पादनक्षमता वाढवली जायला हवी. सध्या कोरोनाच्या संकटामुळे व लॉकडाऊनच्या निर्णयामुळे कोळशाचे उत्पादन बंद आहे, परंतु लॉकडाऊनच्या समाप्तीनंतर वेगाने कोळसा मागणी वाढणार असल्याचे भाकीत कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्हिडीओ परिषदेत बोलताना स्पष्ट केले. तेव्हा याची दखल घेऊन उत्पादन वाढवण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

मागणी वाढण्याचे संकेत

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प आहेत. परंतु लॉकडाऊनच्या समाप्तीनंतर पुन्हा नव्याने उद्योग व्यवसाय सुरु झाल्यास मोठय़ा प्रमाणात कोळशाला मागणी होणार आहे. त्यामुळेच 2023-24 साठी एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे ध्येय निश्चित केले असून त्यासंबंधीची रणनीती चालू आर्थिक वर्षापासून करण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

Related Stories

एलॉन मस्ककडून समभाग दान

Patil_p

मायक्रोसॉफ्ट नोएडामध्ये प्रकल्प उभारणार

Patil_p

निर्बंध हटवल्याने सोने आयातीत वाढ

Patil_p

थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ

Patil_p

फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीसचा आयपीओ

Patil_p

बीपीसीएलसाठीच्या स्पर्धेत जगात बलाढय़ कंपन्या ?

Amit Kulkarni