10 महिन्यात 698 दशलक्ष टन उत्पादन ः 1.31 अब्ज टनाचे उद्दिष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशांतर्गत कोळसा उत्पादनामध्ये गेल्या दहा महिन्यांमध्ये 16 टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत कोळसा उत्पादन 698.25 दक्षलक्ष टन इतके राहिले आहे.
वाणिज्य खाणींमधून उत्पादनाचे प्रमाण 30 टक्के इतके वाढले असल्याचेही समोर आले आहे. कोळसा मंत्रालयाने 2025 पर्यंत 1.31 अब्ज टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.


10 महिन्यात 698 दशलक्ष टन उत्पादन
एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत 698.25 दक्षलक्ष टन इतके कोळसा उत्पादन घेण्यात आले. जे 16 टक्के अधिक नोंदविले गेले आहे. गेल्या महिन्यांच्या कालावधीमध्ये कोळसा उत्पादनामध्ये 15 टक्के इतकी वाढ दिसली आहे. या कालावधीमध्ये कोल इंडिया लिमिटेडने 550.93 दक्षलक्ष टन कोळसा उत्पादन घेतले आहे. विजेच्या वापरामध्ये सततची होणारी वाढ कोळसा मागणीसाठी कारणीभूत ठरत आहे. यातूनच उपलब्ध मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा उत्पादनात वाढ केली जात आहे.
तीन वर्षाच्या तुलनेमध्ये भारताने सर्वाधिक कोळसा उत्पादन घेतले असल्याची बाबही समोर आली आहे. गेल्या काही वर्षामध्ये देशांतर्गत पातळीवर उत्पादनामध्ये वाढ नोंदविली जात आहे. 2019-20 मध्ये 6.47 टक्के वाढीसह 730.87 दक्षलक्ष टन इतके कोळसा उत्पादन घेतले जात होते. जे वाढून 2021-22 मध्ये 778.19 दक्षलक्ष टन इतके झाले आहे.