Tarun Bharat

कोळसा वाहतुक व रेल मार्ग दुपदरीकरणाविरोधात कासावलीत रॅली

Advertisements

प्रतिनिधी / वास्को

गोव्यात कोळसा नको आणि रेल मार्गाचे दुपदरीकरणही नको अशी मागणी करीत कासावलीत भागात ग्राम कृती समिती, गोंयचो एकवोट, गोंयचो आवाज तसेच रेन्बो वॉरियर्स  व इतर संघटनांतर्फे रॅली काढण्यात आली. गोव्याच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचीही मागणी या रॅलीमध्ये करण्यात आली.

बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास या रॅलीला प्रारंभ झाला. भाटी, आरोसी, कुयेली, बागा व कासावलीच्या इतर गावांमधून ही रॅली काढण्यात आली. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही रॅली कासावली बाजारातील स्पोर्टस् कॉम्प्लॅक्सजवळ आल्यावर या रॅलीची सांगता झाली. यावेळी अभिजीत प्रभुदेसाई, विदेश भगत व इतरांनी रॅलीला मार्गदर्शन केले. गोव्यात कोळसा नको, रेल मार्गाचे दुपदरीकरण नको, पर्यावरणाचे रक्षण करा अशा मागण्यांचे एक निवेदन या रॅलीतर्फे कासावलीचे सरपंच जुझेमारी फुर्तादो यांना सादर करण्यात आले. गोवा वाचवण्यासाठी असेच बाहेर पडा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Stories

नळाचे बिल तब्बल दीड लाख रुपये

Patil_p

दुपदरीकरण झाल्यास प्रवासी रेल्वेगाडय़ांची संख्या वाढणार

Patil_p

वेरोडा येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरिण देवस्थानचा आज वार्षीक पिंडीकोत्सव

Amit Kulkarni

चौथ्या लाटेसाठी आरोग्य खाते सज्ज

Patil_p

गोव्याला ‘सेक्स टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न

Patil_p

पणजीत सुशोभित गणेश विसर्जनस्थळांचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!