Tarun Bharat

कोवळय़ा मुलासह आठ कोरोना बळी

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात कोरोना बळींचे सत्र चालूच असून काल मंगळवारी 8 महिन्यांच्या कोवळ्या मुलासह एकूण 8 जणांचा अंत झाला. त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या आता 468 झाली आहे. नवीन 519 रूग्ण सापडले तर 594 जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या 4720 सक्रीय रूग्ण असून विविध इस्पितळात कोविड सेंटरात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

आतापर्यंत एकूण 36238 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 31050 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. संशयित रूग्ण म्हणून 89 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 305 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

 केपेतील आठ महिन्यांच्या बालकाचा बळी

शिरवई-केपे येथील 8 महिन्यांच्या बालकास कोरोनाच्या संसर्गामुळे मंगळवारी मृत्यू आला. गोमेकॉत 5 जणांनी तर ईएसआय हॉस्पिटल-मडगाव येथे 3 जणांनी प्राण सोडला. सर्वजण कोरोनाबाधित होते, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. सांत इस्तेव, मोरजी, कुर्टी, खोर्जुवे, मुरगाव, नागवे व वास्को येथील रूग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.

विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- डिचोली-147, सांखळी-247, पेडणे-164, वाळपई-155, म्हापसा-219, पणजी-213, हळदोणा-120, बेतकी-84, कांदोळी-170, कासारवर्णे-66, कोलवाळ-98, खोर्ली-190, चिंबल-193, शिवोली-218, पर्वरी-275, मये-43, कुडचडे-127, काणकोण-165, मडगांव-378, वास्को-246, बाळ्ळी-67, कासावली-97, चिंचिणी-45, कुठ्ठाळी-146, कुडतरी-76, लोटली-65, मडकई-70, केपे-91, सांगे-102, शिरोडा-35, धारबांदोडा-62, फोंडा-263, नावेली-83.

Related Stories

शशिकलाताई काकोडकर यांचा जयंती सोहळा 9 रोजी

Amit Kulkarni

धर्मा भोमकर यांचे निधन

Omkar B

काणकोणात 45 वर्षांवरील पूर्ण लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज

Amit Kulkarni

गांधी मार्केटच्या अंतर्गत भागातील रस्त्याचे डांबरीकरण मार्गी

Amit Kulkarni

पी. चिदंबरम-दिनेश गुडूरांव आजपासून पुन्हा गोवा दौऱयावर

Amit Kulkarni

उत्पल पर्रिकर विधानसभा पणजीतूनच लढणार

Abhijeet Khandekar