Tarun Bharat

‘कोविड’चा शनिवारी एकच रुग्ण

सर्वांची प्रकृती स्थिर शुक्रवारी 9 जणांना डिस्चार्ज

प्रतिनिधी / मडगाव

मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये काल शनिवारी दिवसभरात एकच रुग्ण दाखल झाल्याची माहिती कोविडच्या डॉक्टरांनी दिली. या हॉस्पिटलात सध्या 39 रुग्ण उपचार घेत असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, शुक्रवारी 9 जणांना हॉस्पिटलातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

काल शनिवारी दिवसभरात कोरोना संक्रमित एकच रुग्ण आढळून आल्याने कोविड हॉस्पिटलसाठी दिलासा देणारा ठरला. त्यात उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने हॉस्पिटलमधील वातावरण देखील उत्साही आहे. आतापर्यंत या इस्पितळात एकूण 55 कोरोना संक्रमित रुग्ण आले त्यात पहिल्या टप्प्यात 7 जण होते. त्यांच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाल्यानतंर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. काल शुक्रवारी दुसऱया टप्प्यात 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता 39 जणांवर उपचार सुरू आहेत.

पुन्हा पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा गोंधळ

दरम्यान, शुक्रवारी कोविड हॉस्पिटलात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तिघांना आणले गेले होते. त्यांना हॉस्पिटलात आणून वॉर्डमध्ये भरती करणार तोच त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना पुन्हा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात एकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्याला काल पुन्हा कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. अन्य एकाचा अल्प पॉझिटिव्ह आल्याने त्यांची दुसऱया चाचणी केली जाणार आहे तर तिसऱयाचीसुद्धा फेर चाचणी केली जाणार आहे.

यापूर्वी देखील असाच पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा अहवाल आल्याने गोंधळ झाला होता. त्यावेळी चाचणी खासगी लॅबमध्ये करण्यात आली होती. काल तिघांचा अहवाल निगेटिव्ह असताना त्यांना कोविड हॉस्पिटलात भरती करण्यासाठी आणले व थेट उपचारासाठी वॉर्डात नेण्यात आले व नंतर पुन्हा बाहेर काढण्यात आले. यामुळे हे तिघेजण अप्रत्यक्षरित्या कोरोनाच्या संपर्कात आले व त्यातील एकाचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला.कोरोना पॉझिटिव्ह-निगेटिव्ह ठरविताना व्यवस्थित काळजी घ्यावी, अशी मागणी आत्ता जोर धरू लागली आहे.

Related Stories

उद्यापासून गजबजणार कॅसिनो स्पा, मसाज पार्लरनाही सरकारची मान्यता

Patil_p

…आणि पुरामुळे अडकलेल्या मृतदेहावर झाले अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

पिसुर्ले, सोनशी, वाघुरेत खाण खंदकांचा धोका

Amit Kulkarni

भंडारी समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मोहन भागवत यांची सदिच्छा भेट

Amit Kulkarni

मुरगावांत भाजपाविरोधी 1400 मते मतदार यादीतून गाळण्याचे प्रयत्न

Patil_p

सत्तरीच्या पहिल्या लोकवस्तू संग्रहालयाचे आज केरी येथे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!