Tarun Bharat

कोविडचे 15 लाख विमा दावे निकालात

Advertisements

भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाची माहितीः 22 जूनपर्यंतची आकडेवारी

वृत्तसंस्था /मुंबई

विमा कंपन्यांकडून जून महिन्याच्या 22 तारखेपर्यंत देशभरामध्ये जवळपास 15,000 कोटी रुपयांचे 15.39 लाख कोरोनाचे आरोग्य विम्यांचे दावे निकालात काढले असल्याची माहिती भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) यांनी दिली आहे.

विमा कंपन्यांना या कालावधीपर्यंत एकूण 19.11 लाख कोविड विम्यांचे दावे प्राप्त झाले असून यामध्ये 80 टक्के दावे निकालात काढले असल्याची माहिती आहे. आयआरडीएआयचे सदस्य टीएल अलामेलु यांनी सांगितल्या प्रमाणे देशभरात 22 जूनपर्यंत प्राप्त झालेल्या 19,11,384 कोविडसंदर्भातील विमा दाव्यांशी संबंधीत जवळपास 15 हजार कोटी रुपयांच्या दाव्यात 15,39,434 दावे निकालात काढले आहेत. असोचॅमकडून आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पातळीवर 13 व्या ई-शिखर संमेलनामध्ये संबोधित करताना मृत्युच्या दाव्यासंबंधीत जवळपास 55,276 दावे प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये जवळपास 88 टक्के म्हणजे 48,484 दावे या अगोदरच निकालात काढले असल्याचे म्हटले आहे. जीवन आणि बिगर जीवन विमा कंपन्यांनी महामारीच्या दरम्यान चांगले प्रदर्शन केले आहे. वर्ष 2020-21मध्ये जवळपास 9 टक्क्यांची वृद्धी प्राप्त केली आहे.

डिजिटलचे योगदान

अर्थ मंत्रालयातील संयुक्त सचिव सौरभ मिश्रा यांनी म्हटले आहे, की जीवन  विमा व्यवसायात वृद्धीमध्ये डिजिटलीकरणाचे मोठे योगदान राहिले आहे.

Related Stories

बेंगळूर : बायोकॉनच्या प्रमुख किरण मजूमदार शॉ यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

सरकारकडून व्यापारी मंडळावर 29 सदस्यांची नियुक्ती

Patil_p

यस बँकेला 151 कोटीचा नफा

Patil_p

चालू वर्षात बँकांचा एनपीए वाढण्याचे संकेत

Patil_p

ऑनलाईन फार्मा उद्योगावर टाटाचे लक्ष्य

Patil_p

शेअर बाजारात आज पुन्हा उसळी; सेन्सेक्स २९ हजार पार

tarunbharat
error: Content is protected !!