Tarun Bharat

कोविड इस्पितळात बेडची नेमकी संख्या किती?

Advertisements

जनतेला माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी

प्रतिनिधी/ बेळगाव

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या केवळ कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. काही खासगी इस्पितळांनीही कोरोनाबाधितांसाठी बेड राखीव ठेवले आहेत. मात्र, कोणत्या इस्पितळात त्यासाठी किती बेड आहेत? त्यातील रुग्णांसाठी किती उपलब्ध आहेत? याची माहिती मिळणे कठीण झाले आहे. यासंबंधी स्पष्ट माहिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या पुढाकाराची गरज आहे.

सध्या कोरोनाबाधितांवर उपचारासाठी नातेवाईक व कुटुंबीयांना एका इस्पितळापासून दुसऱया इस्पितळापर्यंत भटकावे लागत आहे. एक बेड मिळविण्यासाठी हातापाया पडण्याबरोबरच वशिलेबाजीचा वापर करावा लागत आहे. या परिस्थितीत बदल करण्यासाठी एकूण बेडसंख्येसंबंधी एकत्रित माहिती सरकारी यंत्रणेजवळ असण्याची गरज असते. मात्र, यासाठी अद्याप प्रयत्न झालेले नाहीत.

एखाद्या इस्पितळात शंभर बेड उपलब्ध असतील तर त्यापैकी किती बेडवर रुग्ण आहेत आणि रिकामे किती आहेत, याची स्पष्ट माहिती मिळविण्याचा अधिकार रुग्णांना असतो. मात्र, कोणत्याही इस्पितळात यासंबंधीची माहिती दिली जात नाही, अशी परिस्थिती आहे. रुग्ण घेऊन जाताच ‘बेड नाही’ असे उत्तर मिळते. अशा उत्तरामुळे अनेक रुग्ण दगावल्याचेही प्रकार घडले आहेत.

असे प्रसंग टाळण्यासाठी विजापूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने एकत्रित माहिती जमविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी एकूण इस्पितळे किती? अशा इस्पितळात उपलब्ध बेडसंख्या किती? कोणत्या इस्पितळात किती रुग्ण दाखल झाले आहेत? किती बेड शिल्लक आहेत? याचा तपशील रोज दोन वेळा जिल्हा प्रशासनाला मिळतो आहे. बेळगावात अशी पारदर्शक यंत्रणा राबविण्यात आली नाही. रुग्ण व नातेवाईकांना अंधारात ठेवून बेड शिल्लक नसल्याचे उत्तर देण्यात येत असल्याने जनतेच्या मनात पारदर्शकतेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.

बेळगावात मात्र असे प्रयत्न आजवर झाले नाहीत. काही तज्ञ डॉक्टरांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला रोजच्या रोज यासंबंधीची माहिती जमवून गोंधळाचे वातावरण दूर करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात ते कधी शक्मय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंबंधीचा तपशील रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना मिळाला तर सध्या काय परिस्थिती आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. मात्र, नातेवाईकांना अंधारात ठेवून रुग्णाला दाखल करून घेण्यासच नकारघंटा देण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

लवकरच तपशील मिळणार? (फोटो नंबर 23डीआय53)

यासंबंधी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांची बैठक घेतली आहे. बेडसंख्या व अन्य तपशील रोजच्या रोज एकत्रित करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. लवकरच याची कार्यवाही सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. बेळगावसारख्या मोठय़ा जिल्हय़ात अद्याप यासाठी का प्रयत्न झाले नाहीत? याचे उत्तर मात्र कोणी देत नाहीत. शेजारच्या विजापूर जिल्हय़ाचा आदर्श बेळगावात का घेतला जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Stories

निवृत्त वन अधिकाऱयाला धमकावून चार लाखांची लूट

Amit Kulkarni

याला म्हणतात उत्स्फूर्त स्वयंशिस्त

Patil_p

मलिकवाड येथे पथनाटय़ातून जनजागृती

Patil_p

जितो तर्फे ‘शुभारंभ’ कार्यक्रम

Amit Kulkarni

राज्यात सोमवारी 14 नवे रुग्ण

Patil_p

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे मेटगूड हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांचा सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!