Tarun Bharat

कोविड काळात वाढत्या बेरोजगारीने देशातील चोऱ्यांमध्ये वाढ

सर्वेक्षणातील निष्कर्ष

ऑनलाईन टीम / दिल्ली : 

टाळेबंदी उठल्यानंतरच्या काळात देशात चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, प्रामुख्याने वाढती बेरोजगारी हे त्यामागचे कारण असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
‘गोदरेज लॉक्स’कडून सादर करण्यात आलेल्या ‘हर घर सुरक्षित अहवाल 2020 : भारताच्या पोलीस दलाची सुरक्षेविषयीची मते’ या अहवालात यासंदर्भातील निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.

कोविड-19 साथीच्या काळात वाढलेली बेरोजगारी हे समाजातील चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याचे एक कारण असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ चोऱ्या, वाहनांच्या चोऱ्या व दुकाने फोडण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा अहवाल ‘इनकॉग्निटो इनसाईट्स’ या संस्थेने तयार केला आहे.

यासंदर्भात ‘गोदरेज लॉक्स’चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी म्हणाले, या वर्षी कोरोनाची साथ आणि त्यातच चोऱ्यांचे, घरफोडयांचे प्रमाण वाढले असल्याची 65 टक्के पोलिसांची कबुली, यामुळे सुरक्षा हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. सहसा घरफोडी झाल्यावरच 71 टक्के नागरिक घराच्या सुरक्षेचा गंभीरपणे विचार करू लागतात. तर 64 टक्के पोलिसांचे मत असे आहे, की लोक सुरक्षा पद्धतींचा अवलंब करीत नाहीत आणि त्यामुळे त्यांना घरफोडीसारख्या गुन्हय़ांना सामोरे जावे लागते. 

Related Stories

किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी सुरु ठेवण्याचा विचार – राजेश टोपे

Archana Banage

अभिनेता सिद्धार्थचे साहसी पाऊल

Patil_p

भारतीय थिंकटँक ‘स्वातंत्र्य निर्देशांक’ तयार करणार

Patil_p

चौकशीआधीच सोनिया गांधींना कोरोना

Amit Kulkarni

महाराष्ट्रातील संत्तासंघर्ष ः सुनावणी अपूर्ण

Patil_p

नक्षलींशी लढताना पाच जवान हुतात्मा

Patil_p