Tarun Bharat

कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी काटेकोर नियम पालन करा – जिल्हाधिकारी

अनुचित प्रकार घडल्यास राज्य महिला आयोगाच्या हेल्पलाईन व दूरध्वनीवर संपर्क करा

प्रतिनिधी / सांगली

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दि. 18 मे 2021 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. या मानक कार्यप्रणालीचे संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे. अनुचित प्रकार घडल्यास राज्य महिला आयोगाच्या हेल्पलाईन व दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

कोविड-19 ने आजारी असलेल्या महिलेबरोबर कोविड-19 केंद्रामध्ये अनुचित प्रकार घडल्यास मदतीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा हेल्पलाईन क्रमांक, आयोग कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक आणि विभागीय कार्यालय दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. हेल्पलाईन 7477722424, आयोग कार्यालय 022-26592707, आयोगाचे विभागीय कार्यालय क्रमांक – पुणे 020-26330052, अमरावती 0721-2566486, नाशिक 0253-2237422, कोकण 022-25917655, नागपूर 0721-2640050, औरंगाबाद 0240-2325570 महिलांकरिता अपवादात्मक परिस्थिती वगळता स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे. असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

तोरणा आणि चांदोली पर्यटन विकासाबाबत राज्य शासन सकारात्मक

Archana Banage

सांगली : कृष्णेत दिड लाख क्युसेस विसर्ग

Tousif Mujawar

सांगली : …अन्यथा लिंगायत समाजातील मृतदेह महापालिकेत आणून ठेवणार

Archana Banage

आता पथ विक्रेते, फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र

Archana Banage

सांगली जिल्ह्यात नवे 872, कोरोनामुक्त 1292

Archana Banage

सांगली : श्रीराम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त आमदारांनी साजरा केला आनंदोत्सव

Archana Banage