Tarun Bharat

कोविड केअर केंद्रानुषंगाने जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

प्रतिनिधी / कणकवली:

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तालुक्यात कोविड केअर सेंटर करण्याच्या अनुषंगाने हरकुळ बुद्रुक व फोंडाघाट येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपलध सुविधांचा आढावाही घेण्यात आला. जिल्हाधिकाऱयांनी खारेपाटण येथील चेकनाका तसेच वैभववाडी तालुक्यात सांगुळवाडी येथेही कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या अनुषंगाने पाहणी केली.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासोबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार आर. जे. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, नायब तहसीलदार तानाजी रासम तसेच मंडळ अधिकारी मंगेश यादव, दिलीप पाटील, संतोष नागावकर आदी उपस्थित होते.

तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करायचे असल्याने त्यासाठी डॉ. आंबेडकर वसतिगृह, हरकुळ बुद्रुक व फोंडाघाट येथील मराठे कृषी कॉलेजच्या जागेची पाहणी जिल्हाधिकाऱयांनी केली. दोन्ही ठिकाणी उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला असून यापैकी सेंटर अंतिम करण्याबाबत आरोग्य विभागाकडून पुढील कार्यवाही होणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱयांनी खारेपाटण चेकनाका येथे भेट दिली. तेथील अडचणी समजून घेताना पावसाळय़ात जागा अपुरी पडल्यास तातडीची शेड उभारणी करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. वैभववाडी तालुक्यात सांगुळवाडी येथेही कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या अनुषंगाने पाहणी केली.

Related Stories

कुडाळ प्रांताधिकाऱयांना ‘क्लीन चिट’

NIKHIL_N

कामावर हजर झाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईतून सूट

Patil_p

खाडीभागातील खारफुटी धोक्यात

Patil_p

उपळे विजेता, ओणी उपविजेता

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात ‘तौक्ते चक्रीवादळ’ दाखल

Archana Banage

निरुखेच्या आदित्यची कौतुकास्पद कामगिरी

NIKHIL_N