Tarun Bharat

कोविड केअर, हेल्थ सेंटरसाठी सुविधा अद्ययावत करा : जिल्हाधिकारी

प्रतिनिधी/कोल्हापूर

प्रत्येक तालुक्यात एक किंवा दोन मोठी रुग्णालय, वसतीगृह शोधून कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटर तयार आहेत. त्यातील सुविधा अद्ययावत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, दिल्लीवरुन आलेल्यांपैकी काही व्यक्ती चुकुन राहिल्या असतील तर त्या शोधून काढा व सर्वांची सक्तीने तपासणी करा. त्याचबरोबर त्यांचा स्वॅब घेतला आहे का, याचीही खात्री करा. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणीही झाली पाहिजे, याची दक्षता घ्या. अजूनही काही ठिकाणी बाहेरुन लोक येत आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा लोकांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा. संस्थात्मक अलगीकरण केंद्र, निवारा शिबिरे याठिकाणी शासनामार्फत सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. तसेच साखर कारखाना स्तरावरील कामगार शिबिरांमध्ये कारखान्यांनी सुविधा परवायच्या आहेत. अशा ठिकाणी भेटी द्या, त्या ठिकाणी सुविधा पुरविल्या जातात की नाही हे वैयक्तीकरित्या तपासून अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

ग्रामस्तरावरील बाहेरुन आलेल्या ज्या लोकांची माहिती अद्यापही अपूर्ण आहे ती ग्राम समितीच्या संपर्क अधिकाऱ्यांकडून तात्काळ भरुन घ्या. मुख्याधिकाऱ्यांनीही प्रभाग समितीच्या संपर्क अधिकाऱ्यांची माहिती द्यावी. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या बाबतीत त्याच्या इतिहासाची बारकाव्याने नोंद घ्या. तो कुठे गेला, कसा आला, कुणाला भेटला इत्यंभूत माहिती घ्या. आरोग्य सेवक, आशा वर्कल, एएनएन, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून काटेकोरपणे सर्व्हेक्षण झाले पाहिजे. त्यावर तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनी नियंत्रण ठेवाण्याच्या सुचना देखील करण्यात आल्या.

अधिकच्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रांसाठीही ठिकाणं शोधावीत. कोविड हॉस्पिटलच्या जवळपास ही ठिकाणं असावीत. ग्रामीण भागात धान्य वाटप सुरु आहे. त्याठिकाणी गर्दी होणार नाही. सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. केसरी कार्ड धारकांनाही मे-जून मध्ये धान्य पुरवठा होणार आहे. हा धान्य पुरवठा सुरळीत राहील हे पहावे. शेतीच्या कामाला अडवू नका ती सुरळीत चालू राहतील याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महसूलचे उप जिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.

Related Stories

येत्या प्रजासत्ताकदिनी 10 हजार सौर कृषी पंप वितरणाचे आदेश देणार : डॉ. नितीन राऊत

Tousif Mujawar

कोल्हापूर : पर्चेस नोटिसीव्दारे कुळे काढण्याच्या सुपाऱ्या

Archana Banage

Archana Banage

लोकसभेला मी इच्छुक नाही,पुन्हा एकदा आमदार होण्याची इच्छा; हसन मुश्रीफ

Rahul Gadkar

शहरातल्या भटक्या कुत्र्यांचे होणार आता निरबीजिकरण

Patil_p

कोल्हापुरात कार्यक्षमता वाढीसाठी पंचायत राज कर्मचाऱयांना ट्रेनिंग

Archana Banage