Tarun Bharat

कोविड निगा केंद्राला विरोध राजकीय प्रेरणेनेच !

शिरोडा भाजपा मंडळाचा आरोप

प्रतिनिधी / शिरोडा

शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड निगा केंद्र सुरु करण्यास झालेला विरोध हा निव्वळ राजकीय हेतुने पेरित होता. काही राजकीय लोकांनीच स्थानिकांमध्ये भिती पसवून त्यांची दिशाभूल केली आहे. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन सहकार्य करण्यापेक्षा आपले राजकीय हित साधण्यासाठी जनतेला भरीस घालणे योग्य नाही, अशी टिका शिरोडा भाजपा मंडळाने केली आहे.

 रविवारी शिरोडय़ात ज्या काही मोजक्याच लोकांनी कोविड निगा केंद्र सुरु करण्यास जो विरोध दर्शविला व स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर यांच्याशी हुज्जत घातली तो प्रकार निषेधार्ह असल्याचे शिरोडा भाजप मंडळाचे सरचिटणिस अवधूत नाईक म्हणाले. फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिरोडा भाजपाचे अध्यक्ष सूरज नाईक, शिरोडय़ाचे सरपंच अमित शिरोडकर व सुभाष नाईक हे उपस्थित होते. गोव्यात कोरोनाबाधीत रुग्णांची वाढत चाललेली संख्या चिंताजनक असून त्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होणे साहजिकच आहे. पण रुग्ण सेवेला विरोध करणे तेवढेच चुकीचे आहे, असे सूरज नाईक यांनी सांगितले. चिखली वास्को येथील कोविड इस्पितळात अचानक रुग्ण वाढल्याने सरकारला शिरोडा आरोग्य केंद्रात कोविड निगा केंद्र उभारावे लागले. सरकारचा निर्णय जनहितार्थ असून याठिकाणी गोमंतकीयांनाच सेवा मिळणार असल्याने त्याला विरोध करणे निरर्थक आहे, असेही ते म्हणाले.

 शिरोडा येथील आरोग्य केंद्रात सध्या 60 रुग्णांवर उपचार करता येईल एवढी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाह्य़रुग्ण विभाग आयुर्वेद महाविद्यालयात हलविण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच अमित शिरोडकर यांनी दिली. शिरोडा वासियांनी या कोविड निगा केंद्राबद्दल गैरसमज न बाळगता सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शिरोडय़ात कोविड निगा केंद्राला रविवारी जो विरोध झाला, त्यामागे स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर व भाजपा विरोधकांची लोकांना चिथावणी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Related Stories

‘गुगल पे’ वरून लाच घेणाऱ्या फोंडा पोलिसांना निलंबित करा

Patil_p

कुडचडेतील चंदेरी महोत्सव गोव्याचे भूषण

Amit Kulkarni

आंतरराष्ट्रीय वॉटरकलर सोसायटीच्या तिसऱया द्विवार्षिक कार्यक्रमात कालिदास सातार्डेकर यांचा सहभाग

Amit Kulkarni

निसर्गसंपन्न गोव्यात चित्रिकरणाला प्राधान्य द्या

Amit Kulkarni

ई – बाईकमुळे कार्बनवर येणार नियंत्रण

Patil_p

ग्राम पंचायत ओबीसी आरक्षण निवाडा राखून

Amit Kulkarni