Tarun Bharat

‘कोविड प्रतिबंधासाठी स्वॅब तपासणी करा’

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांचे आवाहन, तपासणी न केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना तपासणीसाठी जास्तीत जास्त स्वॉब नमुने घेणे गरजेचे असताना नागरिक तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे विषाणू संसर्ग झपाटयाने वाढू शकतो. यासाठी अतिजोखमीचा गट (सुपर स्प्रेडर), कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले, सर्दी, ताप, खोकला लक्षणे असलेले, प्रतिबंधीत क्षेत्रातील व सारी सारखे लक्षणे असलेल्या रुग्णांनी स्वत:हून स्वॅब तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे निदान करणे सोपे होईल व आपले नातेवाईक, कुटुंबीय, मित्रपरिवार, जेष्ठनागरिक सुरक्षीत राहतील, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी केले.

राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत झपाट्याने वाढत आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव परत मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाया योजना राबविण्यात येत आहे. रात्रीची संचार बंदी, मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकावर दंड आकारणे, सामाजिक अंतर पालन करणे, धार्मिक, सामाजिक, राजकिय कार्यक्रमावर बंदी, नो मास्क, नो एन्ट्री आदी उपाययोजना राबविण्यात येते आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविड प्रार्दुभाव वाढत आहे. प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी जास्तीत जास्त लोकांनी स्वॉब नमुने तपासणी करणे गरजेचे आहे. कोविड निदानासाठी आर.टी. पी.सी.आर. व रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट अत्यंत महत्वाची आहे. कोविड चाचणीचे प्रमाण वाढल्यास रुग्णांस निश्चित निदान होवून त्वरीत उपचार मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांचा आजार बळवणार नाही. आणि इतरांना संसर्ग होणार नाही. पर्यायाने पॉझिटिव्ह रेट व मृत्यूदर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होणार आहेत.

मार्च महिन्यात 35 हजार तपासण्या अन् 1 हजार 458 रुग्ण

जिल्हयामध्ये जानेवारी 2021 मध्ये 29 हजार 166 इतके स्वॅब नमुने घेतले होते. तर 431 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. तर फेब्रुवारीमध्ये 26 हजार 20 इतके स्वॅब नमुने घेतले होते. त्यामध्ये 601 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. 30 मार्च 2021 अखेर 35 हजार 438 इतक्या रुग्णांचे स्वॉब नमुने घेतले असून 1 हजार 458 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

जिह्यात येथे होणार स्वॅब तपासणी

स्वॅब तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविघालय, आय.जी.एम. रुग्णालय इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, सर्व तालुक्यातील कोवीड काळजी केंद्रे, ऍस्टर आधार हॉस्पीटल कोल्हापूर, डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, अंबिका लॅबरोटरी कोल्हापूर, जीवन लॅबरोटरी, कोल्हापूर, या ठिकाणी तपसाणी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने स्वॅब टेस्टींगसाठी पुढे यावे, असे अहवान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

         

Related Stories

सतेज पाटील यांना रोखण्यासाठी भाजपची फिल्डिंग

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शहीद जवान संग्राम पाटील अनंतात विलीन

Archana Banage

अतिक्रमण हटाव कारवाईस तुर्तास ब्रेक

Archana Banage

केंद्रीय गृहमंत्री शहा साधणार भाजप कार्यकर्त्यांशी संवाद

Abhijeet Khandekar

बावडय़ातील त्या वृद्धेचा दुसरा स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह

Archana Banage

कोरोनाच्या काळात तुळशीची बाजारपेठ विस्तारली

Archana Banage