Tarun Bharat

कोविड रुग्णांचे अंत्यविधी करणाऱ्या ललित जाधव यांना मदत

ऑनलाईन टीम / पुणे :

कोरोना महामारीने मृत झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी कुटुंबियांना करता येत नाही. मानवी आयुष्यातील हा शेवटचा विधी असतो, त्यामुळे तो महत्त्वाचा असतो. हेच महत्त्वाचे काम कैलास स्मशानभूमीमधील ललित जाधव आणि त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रशांत गांधी यांनी त्यांना मदत करुन त्यांचा सन्मान देखील केला.

अभिनंदन प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत गांधी यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून सणस मैदानासमोरील चौकात कार्यकर्त्यांसह एकत्र येत कोविड रुग्णांचे अंत्यविधी करणाऱ्या ललित जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 11 हजार रुपये रोख रक्कम, कपडे व धान्य स्वरुपात मदत केली. यावेळी सुरेश जैन, नगरसेवक संतोष कदम, संजय रसाळे, विशाल पवार, मदन कोठुळे, शैलेश बडदे, प्रकाश बाफना, अजिंक्य पालकर, अभिजीत महामुनी, महादेव ढमाले, अमोघ ढमाले, राजेंद्र जाजू उपस्थित होते.

प्रशांत गांधी म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात कोरोनाग्रस्तांपासून लांब राहिले जाते. परंतु ललित जाधव आणि त्यांचे सहकारी कोरोनामुळे मृत रुग्णांचे अंत्यविधी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. या काळात प्रत्येकाने आपल्याला जमेल तसे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गरजूंना मदत करावी. मदत करण्याची हीच खरी वेळ आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

लातूरच्या प्रसिद्ध उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Abhijeet Khandekar

ठाण्याच्या सभेला ये, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो; राज ठाकरेंचा वसंत मोरेंना आदेश

Archana Banage

Anil Deshmukh: सीबीआयचे पथक मुंबईतील एनआयएच्या कार्यालयात दाखल

Archana Banage

मी नाना आहे….दादा नाही; घटकपक्षांचा सन्मान होईल अशा पद्धतीनेच जागा वाटप- नाना पटोले

Abhijeet Khandekar

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्ष

Archana Banage

राज्याच्या विकासासाठी भाजप-शिवसेनेचे ‘डबल इंजिन’च हवे

datta jadhav