Tarun Bharat

कोविड रूग्णालयांना कराडकरांनी पुरवला ऑक्सिजन

Advertisements

वार्ताहर/ कराड

नाशिकमधील घटनेने स्थिती पॅनिक झालेली असताना कराड शहरातील काही कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पहिल्या लाटेत शहरात सुरू झालेल्या ऑक्सिजन चळवळीने रूग्णालयांना हातभार लावला. शहरातील विविध ग्रुप, संस्था, नगरपालिका यांनी पोर्टेबल ऑक्सिजन मशिन तातडीने हॉस्पिटल्सना पुरवल्याने हॉस्पिटल्सना दिलासा मिळाला. दरम्यान, हॉस्पिटलना ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.

कराड शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपत आल्याने संबंधित रूग्णालयांनी तशी माहिती पालिकेस व रूग्णांच्या नातेवाईकांना दिली होती. त्यानंतर पालिकेकडे विविध संस्थांनी दिलेली पोर्टेबल ऑक्सिजन मशिन हॉस्पिटलना पोच करण्यासाठी धावपळ सुरू झाली. पालिकेने काही मशिन पोच केली. ही माहिती समाजमाध्यमांवर आल्याने दक्ष कराडकर ग्रुप, गब्बर गुप, रयत संघटना, शाहू चौक मित्रपरिवारसह विविध संस्थांनी त्यांची मशिन एरम हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल यांना मशिन पोच केल्या. दक्ष कराडकर गुपने बुधवारी एरम हॉस्पिटला 10, राजश्री हॉस्पिटला 10 व कराड हॉस्पिटलला 4 मशिन देण्यात आल्या. यावेळी प्रमोद पाटील, मनसेचे शहर अध्यक्ष सागर बर्गे, विजय मुठेकर, साबिरमियाँ मुल्ला, गणेश पवार, अमित पाटणकर, समाधान चव्हाण, सिद्धार्थ पाटणकर उपस्थित होते. पालिकेनेही आपल्या मशिन हॉस्पिटल्सना सुपूर्द केल्या. मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनीही प्रयत्न केले.

नगरपालिकेकडे एकूण अकरा पोर्टेबल मशीन असून शहरात सामाजिक संस्था व व्यक्तींच्याकडे सुमारे शंभर मशिन उपलब्ध आहेत. यापैकी काही मशिन्स सातारा जिल्हा विविध ठिकाणी रुग्णांच्या मदतीसाठी दिल्या आहेत. ते काम झाल्यानंतर सदरच्या मशिन कराडमध्ये आणल्या जातील. 

पालिकेच्या मशिन नागरिकांकडेच; तात्काळ जमा करण्याचे आवाहन

दरम्यान, गतवर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी रुग्णांना ऑक्सिजन मिळावा. यासाठी पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देण्याबाबत आवाहन केले होते. याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि पालिकेकडे पोर्टेबल मशीन जमा झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी या मशिन उपचारासाठी नेल्या आहेत. मात्र त्या अद्याप पालिकेकडे जमा केलेल्या नव्हत्या. त्यामुळे संबंधितांनी तातडीने मशिन पालिकेकडे जमा कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे. 

ज्या नागरिकांनी विनाकारण पालिकेच्या पोर्टेबल ऑक्सिजन मशीन गेल्या चार महिन्या पासून स्वतः जवळ ठेवल्या आहेत. त्यांनी तात्काळ मशीन नगरपालिका कार्यालयात जमा कराव्यात. शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा झाला तर या  मशीनचा रुग्णांचा जीव वाचवायला मदत होणार आहे. त्यामुळे तात्काळ मशीन आणून दयाव्यात. अन्यथा त्यांची नावे नाइलाजास्तव प्रसिद्ध करण्यात येतील व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही रमाकांत डाके यांनी सांगितले. 

कराडमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता नाही-तहसीलदार

दरम्यान, शहरासह तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलिंडर आहेत. त्याची कोठेही कमतरता नाही. दरम्यान ऑक्सीजन सिलेंडर कमी पडणार नाहीत, याची व्यवस्था प्रशासनाने केली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.  दरम्यान समाज माध्यमांचावर कराडमध्ये ऑक्सिजन सिलिंडर अपुरे असल्याचे मॅसेज फिरत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक प्रशासन सज्ज व सजग असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले

Related Stories

दोन दिवसीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर घेरणार -आशिष शेलार

Abhijeet Shinde

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन

datta jadhav

सातारा आगारात डिझेलचा तुटवडा

datta jadhav

आईकडे जाता येत नसल्याच्या नैराश्यातून युवतीची आत्महत्या

Abhijeet Shinde

व्यापाऱयाच्या खुनाचा कट उधळला

Patil_p

अजिंक्यताऱयावर मावळ्यांनी राबवली संवर्धन मोहीम

Omkar B
error: Content is protected !!