Tarun Bharat

‘कोविड वॉरियर’ देसाई यांच्या कार्याचे कौतुक

एअर इंडियाच्या माध्यमातून औषध वितरण

प्रतिनिधी / सावंतवाडी:

डेगवे-मोयझरवाडी येथील कोविड वॉरियर दिलीप देसाई यांच्या कामाचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विटरद्वारे कौतुक केले आहे. सावंवाडीकराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा दिलीप देसाई यांच्या रुपाने खोवला आहे. 

दिलीप देसाई एअर इंडियाच्या सुरक्षा विभागात अधीक्षकपदावर कार्यरत आहेत.  सध्या ‘कोरोना’मुळे संपूर्ण जग विस्कळीत झाले आहे. बरेचसे भारतीय प्रवासी परदेशात अडकले, त्यांना भारत सरकारने एअर इंडियाच्या मदतीने भारतात सुरक्षित परत आणले. भारतात जेव्हा ‘कोरोना’ व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा लॉकडाऊन जाहीर झाले आणि  रेल्वे, विमान, बससेवा बंद आहे. घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले. मात्र, जगभरात आणि भारतातसुध्दा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी तसेच इतरही कर्मचारी कामाला लागले. प्रत्येकजण आपल्या जबाबदारीने अहोरात्र काम करत आहे. मात्र, आता लागणारी औषधसामग्री कुठून आणायची, अशी बिकट स्थिती होती. अशावेळी एअर इंडिया पुन्हा मदतीसाठी धावून आली. देशांतर्गत तसेच परदेशात बरीच विमाने ‘कोरोना’विरुद्ध लढणारी साधनसामुग्री तसेच औषधे घेऊन रवाना झाली.

                          दिल्ली दरबारी दखल

देशांतर्गत अशीच सुविधा पुरविण्याची जबाबदारी एयर इंडियावर आली. त्यात पीपीई किट, औषधे आदी सामुग्री भारताच्या कोनाकोपऱयात पोहोचविली जाणार होती. कर्मचाऱयांची उपस्थिती नगण्य असतांनाही एअर इंडिया ही जबाबदारी पार पाडत आहे, ते दिलीप देसाई यांच्यासारख्या कर्मचाऱयांमुळे. आपले काम नसतांनाही अहोरात्र सगळी औषधे जातीने लक्ष घालून जबाबदारीने विमानातून पोहोचविली. त्यांच्या कामाची नोंद दिल्ली दरबारी नागरी विमान मंत्रालयापर्यंत पोहोचली. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिलीपच्या कामाची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

                            कर्मचाऱयांचे कौतुक

दिलीप देसाई यांनी सागितले की, मी एअर इंडियात सुरक्षा विभागात कामाला आहे. एअर इंडियाची कार्गो सेवा आहे. त्या अंतर्गत देशभरात औषधे तसेच वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. डॉक्टरांचे रुट ठरविले जाऊन त्यांना आवश्यक तेथे पोहोचविले जाते. त्यात समन्वय ठेवण्याचे काम माझ्यावर आहे. माझ्या कामाची दखल घेऊन मंत्र्यांनी कामाचे कौतुक केले आहे. हे एअर इंडिया आणि त्यात सेवेत असलेल्या कर्मचाऱयांचे कौतुक आहे. ही बाब आम्हाला अभिमानास्पद आहे.

Related Stories

स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे उपक्रम

Archana Banage

साखळी उपोषण समर्थनार्थ आज चिपळूण बंद

Patil_p

काथ्या व्यवसायाला उभारी देणार!

NIKHIL_N

शेतकऱयांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी प्रयत्नशील!

NIKHIL_N

खेडमध्ये चक्रीवादळात 567 घरांची पडझड नुकसानीचा आकडा 35 लाखावर

Patil_p

जिल्हा शल्य चिकित्सकांची तातडीने बदली करा!

NIKHIL_N
error: Content is protected !!