Tarun Bharat

कोविड सेंटरमधील आगीत आंध्रात 10 रुग्णांचा मृत्यू

30 कर्मचारी-रुग्णांना वाचविण्यात यश

विजयवाडा / वृत्तसंस्था

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे कोविड सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. 30 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे विजयवाडा पोलिसांनी सांगितले. बरीच मेहनत घेतल्यानंतर आगीवरही नियंत्रण मिळवले आहे. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती विजयवाडाचे पोलीस उपायुक्त विक्रांत पाटील यांनी  दिली.

विजयवाडा येथील हॉटेल स्वर्ण पॅलेसमध्ये रविवारी आगीची भीषण दुर्घटना घडली. हे हॉटेल कोविड सेंटर म्हणून वापरले जात होते. आगीच्या दुर्घटनेवेळी हॉटेलमध्ये 40 जण उपस्थित असल्याचे सांगण्यात आहे. त्यापैकी कोरोनाचे 22 रुग्ण आणि अन्य रुग्णालयातील कर्मचारी होते. 17 रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या कर्मचाऱयांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यासह त्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. ते स्वत: संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि जखमींना अधिक चांगले उपचार देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱयांना दिल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून घटनास्थळी मोठय़ा संख्येने पोलीस बळ तैनात केले आहेत.

खासगी रुग्णालयाने हॉटेल घेतले होते भाडय़ाने

एका खासगी रुग्णालयाने स्वर्ण पॅलेस हे हॉटेल भाडय़ाने घेतल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. येथे कोरोना रुग्णांना उपचारासाठी ठेवले गेले होते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱयांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

Related Stories

कोरोना : दिल्लीत 1693 नवे रुग्ण; 17 मृत्यू

Tousif Mujawar

को-विन लवकरच सर्व देशांसाठी खुले

Patil_p

बिहारमध्ये वीज कोसळून गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

‘जी-7’मध्ये मोदींचा ‘व्हर्च्युअल’ सहभाग

Amit Kulkarni

कुतुबमिनारच्या उत्खननाचा विचार नाही!

Patil_p

काँग्रेसकडून तिसऱ्यांदा विश्वासघात – महेश शर्मा

Patil_p