Tarun Bharat

कोविड सेंटरमधील कचरा नगरपंचायतीच्या वाहनाने उचलला

Advertisements

हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात लावणार विल्हेवाट,महसूल

प्रतिनिधी/ गुहागर

गुहागर तालुक्यासाठी असलेल्या वेळणेश्वर कोविड केअर सेंटरजवळ बाहेर उघडय़ावर टाकण्यात आलेला वैद्यकीय कचरा अखेर गुहागर नगरपंचायतीच्या कचरा संकलन वाहनाने बुधवारी उचलण्यात आला. कोविड केअर सेंटरजवळ याबाबतच कोणतेच नियोजन नसल्याने आता हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रावर कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तालुक्याच्या वेळणेश्वर कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटीव्ह रूग्णाच्या तपासणीवेळी वापरण्यात येणारे पीपीई कीट व इतर वैद्यकीय वस्तू सेंटरच्या बाजूलाच उघडय़ावर टाकल्याने परिसरातील आरोग्य धोक्यात आले होते. येथील वैद्यकीय कचऱयाबाबत कोणतेच नियोजन कोविड केअर सेंटरमध्ये केलेले नसल्याने गेली पाच दिवस हा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाची तारेवरील कसरत सुरू होती.

तहसीलदारांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी कविता बोरकर यांनी नगरपंचायतीचे कचरा संकलन करणारे वाहन देण्याचे कबूल केले. पहिल्यादिवशी हे वाहन वेळणेश्वर येथे पोहचले. मात्र हा कचरा उचलणार कोण, कचरा कोठे टाकणार याबाबत कोणतेच नियोजन प्रशासकीय यंत्रणेने केले नसल्याने वाहन परत आले. त्यानंतर दोन दिवसांनी अखेर यावर तोडगा काढून कचरा हा हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्याठिकाणी असलेल्या खड्डय़ामध्ये टाकून तो जाळण्याचे ठरवण्यात आले. सर्कल अधिकारी वाल्विक मोरे आणि तलाठी परिवहार यांच्या देखरेखीखाली हा कचरा नगर पंचायतीच्या वाहनामध्ये भरण्यात आला.

कोविड केअर सेंटरमधील दोन कर्मचाऱयांनी परिसरातील सर्व कचरा उचलून वाहनाने हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात नेण्यात आला. यापुढे आरोग्य केंद्राने या कचऱयाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले आहे. परंतु यासाठी वाहन कोणते वापरणार ते अद्याप निश्चित झालेले नाही.

कोविड केअर सेंटरचे भाडे व वीज बिलासाठी महसूलकडे निधी नाही

कोविड केअर सेंटरचे ठरवण्यात आलेले भाडे व वीज बिलासाठी महसूल विभागाकडे कोणताही निधी नाही. हा निधी जिल्हा सिव्हील सर्जन यांच्याकडून दिला जातो. यामुळे कॉलेज प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱयांकडे प्रस्ताव पाठवला आहे. महसूल विभागाकडून केवळ कोरोना रूग्णाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमधील निघणाऱया कचऱयाची विल्हेवाटही आरोग्य विभागाने करावयाची असून तशा सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार लता धोत्रे यांनी दिली.

Related Stories

अन्नपूर्णा पित्रे यांचे निधन अल्पशा आजाराने निधन

NIKHIL_N

नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारावरच करणार दिवाळी पहाट!

Patil_p

जिह्यात 508 कोरोनाबाधित; 14 जणांचा मृत्यू

Patil_p

राजापूरात तीनशेहून अधिक वनराई बंधाऱयांची बांधणी

Amit Kulkarni

“शरद पवारांनी नाना पटोलेंचा पान टपरीवालाच करून टाकला”

Abhijeet Shinde

पाचवीचा वर्ग प्राथमिकला जोडण्याचे आदेश

NIKHIL_N
error: Content is protected !!