Tarun Bharat

कोविशिल्डचा दर राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रतिडोस

Advertisements

सिरमची घोषणा, भारतातील लसीचे दर जाहीर

प्रतिनिधी  / पुणे

आगामी काळात `कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन वाढविण्यात येणार असून, अन्य देशांतील लसीपेक्षा, कोविशिल्डचे भारतातील दर कमी असतील तसेच कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस 400 रुपये मोजावे लागतील, अशी माहिती सिरम इन्स्टीटÎूटने बुधवारी दिली.

 सिरम इन्स्टिटÎूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या स्वाक्षरीने  या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीच्या निर्मितीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच, सीरमने लसीचे दरही जाहीर केले आहेत.

 आगामी काळात निर्माण होणाऱया लसीपैकी 50 टक्के लस भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासाठी पुरवली जाईल. उर्वरीत 50 टक्के लस राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना दिली जाईल तसेच पुढील दोन महिन्यांत उत्पादन वाढवून लस तुटवड्याच्या समस्येवर मात करू, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. 

 या पत्रातच लसीचे दरही सिरमने निश्चित केले असून, त्यानुसार, कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस 400 रुपये मोजावे लागतील, तर खासगी रुग्णालयांना लसीचा एक डोस 600 रुपयांना पडणार आहे. अमेरिका, रशिया व चीनमधील लसीच्या तुलनेत कोविशिल्ड स्वस्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 सध्याची गुंतागुंतीची परिस्थिती व तातडीची परिस्थिती लक्षात घेता कॉर्पोरेट कंपन्यांना थेट लसीचा पुरवठा करता येणे अशक्मय आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या व अन्य व्यक्तींनी राज्य सरकारच्या माध्यमातूनच वा खासगी रुग्णालयातूच लस घ्यावी. येत्या चार-पाच महिन्यात कोविशिल्ड खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली जाईल, असेही सीरमने स्पष्ट केले आहे.

Related Stories

नवरात्र उत्सव कोरोनाच्या छायेत

Patil_p

राज्यस्तरीय स्पर्धेत सातारा बॉक्सिंग ऍकॅडमीचा झेंडा

Patil_p

कोल्हापूर : अश्‍विनी कणेकर गेट परीक्षेमध्ये देशात पहिली

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.२५ टक्के

Abhijeet Shinde

वाढीव वीज बिले रद्द करा ; करवीर शिवसेनेचे निवेदन

Abhijeet Shinde

15 ऑगस्टला ग्रामसभा होणार की नाही ?

Patil_p
error: Content is protected !!