Tarun Bharat

कोविशील्ड लसीने रोखले 80 टक्के मृत्यू!

Advertisements

ब्रिटनमधून गूड न्यूज- भारतातही याच लसीचा मोठय़ा प्रमाणात वापर

वृत्तसंस्था  / लंडन

कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देणाऱया भारतासाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे. ब्रिटनच्या कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीतून ऑक्सफोर्ड-ऍस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याने मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येत 80 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. याच लसीला भारतात कोविशील्डच्या नावावर मोठय़ा प्रमाणावर देत आहे.

ऍस्ट्राजेनेका लसीच्या केवळ एका डोसमुळे मृत्यूचा धोका 80 टक्क्यांनी कमी होतो असे ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या विश्लेषणात दिसून आले आहे. तर अमेरिकन कंपनी फायजरच्या लसीच्या दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका सुमारे 97 टक्क्यांपर्यंत कमी होतो. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी या आकडेवारीचे कौतुक करत ही आकडेवारी लस या महामारीतून बचावासाठी उपयुक्त असल्याचा  ठोस पुरावा देत असल्याचे म्हटले आहे.

कोरोनावरील लस देण्यात आल्याने ब्रिटनमध्ये आतापर्यंत 10 जणांचे जीव वाचविण्यात आल्याचा अनुमान पब्लिक हेल्थ इंग्लंडने व्यक्त केला आहे. ब्रिटनच्या 1 कोटी 80 लाख लोकसंख्येतील प्रत्येक तीनपैकी एका प्रौढाला लस देण्यात आली आहे. यामुळे ब्रिटनमधील संक्रमण, रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचा आकडा खूपच कमी झाला आहे. या यशानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सरकार कोरोनाविषाणूसंबंधी लागू निर्बंध शिथिल करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे.

ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यापूर्वी इंग्लंडमध्ये 50 हजार जणांच्या दस्तऐवजाची तपासणी केली होती. हे लोक डिसेंबर ते एप्रिलदरम्यान कोरोनाबाधित झाले होते. यातील 13 टक्के लोकांना फायजरचा पहिला डोस तर 8 टक्के लोकांना ऍस्ट्राजेनेका लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. दोन्हीपैकी प्रत्येक लसीच्या केवळ एका डोसने मृत्यूचे प्रमाण सुमारे 80 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे विश्लेषणातून समजते असे पब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटले आहे.

भारतासाठी महत्त्वपूर्ण आकडेवारी

लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होणाऱयांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. कोरोना संकटाला तोंड देणाऱया भारतासाठी ही आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे. भारतात सध्या 18 वर्षांपर्यंतच्या लोकांना कोरोनावरील लस देण्यात येत आहे. पण ब्रिटनमध्ये 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना ऑक्स्फोर्डची लस घेणे टाळा असा सल्ला देण्यात आला आहे. रक्ताच्या गुठळय़ांची प्रकरणे समोर आल्यावर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे.

Related Stories

पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची सिंधची मागणी

Patil_p

टेक्सासमध्ये प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू

datta jadhav

सर्वाधिक वाढवेग

Patil_p

बर्लिनसाठी अवघड काळ

Patil_p

युएईत विदेशी पर्यटकांना प्रवेश मिळणार

Patil_p

लाख-कोटींमध्ये नव्हे, केवळ 86 रुपयांत घर

Patil_p
error: Content is protected !!