Tarun Bharat

कोवीड रुग्णालयातील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत

ऑनलाईन टीम / पुणे : 


कोवीड-19 रुग्णालये आणि कोवीड-19 हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असून राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक  13/03/2020 पासून लागू केला आहे.


राज्यात तसेच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोवीड-19 रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात पुरेसे ऑक्सीजनचे उत्पादन होऊनसुध्दा वितरण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा होत असल्याची शक्यता आहे. भविष्यात कोवीड-19 रुग्णसंख्येत वाढ होईल आणि ऑक्सीजनची गरज वाढेल ही बाब लक्षात घेता ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होण्याचे दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर समिती गठीत केली आहे. पुणे जिल्हयात कोरोना विषाणू ( कोवीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे सुरु राहण्याकरीता ऑक्सीजन पुरवठा संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. 

Related Stories

रात्री दिवेच बंद करा; उपकरणे सुरूच ठेवा : महापारेशन

prashant_c

मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा वादात?; नामांतरावरुन ‘त्या’ उद्यानाचं उद्घाटन रद्द

datta jadhav

सोलापुरात आज 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

राजधानी एक्सप्रेसचे इंजिन पुन्हा मार्गस्थ करण्यात कोकण रेल्वेला यश

Archana Banage

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Archana Banage

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिकेला अपघात; 3 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar