Tarun Bharat

‘कोवॅक्सिन’ लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये 50 टक्के प्रभावी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोवॅक्सिनचे दोन्ही डोस कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहेत. जर्नल ऑफ लॅन्सेट इन्फेक्शस डिसिजेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिअल वर्ल्ड असेसमेंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, द लॅन्सेटमध्ये यापूर्वी प्रकाशित झालेल्या अंतरिम अभ्यासाच्या निकषांवरून असे दिसून आले आहे की, कोवॅक्सिनचे दोन डोस, ज्याला बीबीव्ही 152 म्हणूनही ओळखले जाते, ते कोरोनावर 77.8 टक्के प्रभावी होते. परंतु आता भारतात झालेल्या अभ्यासात ते 50 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे मानले जाते.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील 2714 आरोग्य कर्मचाऱ्यांवर 5 एप्रिल ते 15 मे या कालावधीत अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ज्यांना कोरोनाची लक्षणे होती त्यांची आरटी-पीसीआर चाचणीही करण्यात आली. जेव्हा हा अभ्यास करण्यात आला, तेव्हा भारतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होता आणि हा व्हेरिएंट 80 टक्के कोरोना प्रकरणांमध्ये आढळला होता. दरम्यान, लॅन्सेटच्या यापूर्वीच्या दाव्यात लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये कोवॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी ठरल्याचे म्हटले आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ही लस 93.4 टक्के, लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये 63.6 टक्के तर डेल्टा विरुद्ध ही लस 65.2 टक्के प्रभावी असल्याचे म्हटले होते.

Related Stories

साताऱ्यातून दोनशे दुचाकीस्वार 11 मारुती दर्शनासाठी रवाना

Archana Banage

महाराष्ट्र : थकित वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आज आक्रोश आंदोलन

Tousif Mujawar

उध्दव ठाकरेंची ‘धनुष्यबाणा’ बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव

Abhijeet Khandekar

2 वर्षांमध्ये 1.59 लाख लोकांना सरकारी नोकरी

Amit Kulkarni

पंतप्रधान मोदी सुरक्षा : कठोर निर्णय लवकरच

Amit Kulkarni

विदेशी विद्यापीठांना कॅम्पस स्थापन करता येणार

Amit Kulkarni