Tarun Bharat

‘कोवॅक्सिन’ 77.8 टक्के प्रभावी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे. पण डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. दरम्यान, भारत बायोटेकने शनिवारी ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल जाहीर करत दावा केला की, ही लस कोरोनाविरुद्ध 77.8 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.

‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 130 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या चाचणीच्या निष्कर्षात ‘कोवॅक्सिन’ लस कोरोना रुग्णांवर 77.8 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे समोर आले. 

कोवॅक्सिनच्या आतापर्यंतच्या कार्यक्षमतेच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, गंभीर रुग्णांवर ही लस 93.4 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. तर कोरोनाच्या डेल्टा प्रकाराविरोधात 65.2 टक्क्यांनी प्रभावी आहे. 

Related Stories

”जर अशा पद्धतीने लोक फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे”

Archana Banage

खासगीकरणाविरोधात बँकांचा संपांचा इशारा

Patil_p

राजनाथ सिंग यांनी घेतली अँटनी-पवार यांची भेट

Patil_p

घातपाताची धमकी : बेंगळुरात सुरक्षेत वाढ

Patil_p

कोल्हापुरात सीबीआयकडून बड्या अधिकाऱ्यास अटक

Archana Banage

‘डीआरडीओ’च्या चौघांना ओडिशामध्ये अटक

Patil_p