Tarun Bharat

कोव्हॅक्सिनचा ‘बूस्टर’ ओमिक्रॉनवरही प्रभावी

चाचणी-संशोधनाअंती ‘भारत बायोटेक’ची घोषणा : लाभार्थींना मोठा दिलासा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटना रोखण्यासाठी प्रभावी असल्याचा दावा संशोधनाअंती करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिन ही भारताची स्वदेशी लस असून तिच्या चाचण्या गेल्या काही दिवसात सुरू होत्या. या चाचण्यांचे अहवाल तपासल्यानंतरच लसीचा बूस्टर डोस ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटविरुद्ध ऍन्टिबॉडी तयार करण्यास सक्षम असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. चाचणीदरम्यान कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोसमुळे 100 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंटला निष्प्रभ केले असून 90 टक्केपेक्षा जास्त ओमिक्रॉन नमुन्यांविरुद्ध प्रभावी ठरल्याचे ‘भारत बायोटेक’ने आकडेवारीसह जाहीर केले.

हैदराबादस्थित भारत बायोटेकने बुधवारी एमोरी विद्यापीठात केलेल्या चाचण्यांचे निकाल जाहीर केले. चाचणीदरम्यान कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस दिलेल्यांच्या ऍन्टिबॉडीज ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले. कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेणाऱया व्यक्तींमध्ये रोगाची तीव्रता आणि हॉस्पिटलायझेशनची शक्मयता कमी करण्याची क्षमता असल्याचे एमोरी लस केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळेच्या विश्लेषणाचे नेतृत्व करणारे मेहुल सुथर यांनी जाहीर केले. तसेच भारत बायेटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनीही याबाबत अधिक माहिती देत आम्ही कोव्हॅक्सिन लसीमध्ये सुधारणा करण्यासाठी नवनवीन शोध-संशोधन करत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर आपली ही लस प्रौढ आणि मुले दोघांनाही दिली जाऊ शकते. ही ‘रेडी टू यूज’ लस द्रव स्वरुपात असून 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाते, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

अलाहाबाद विद्यापीठात शुल्कवाढीवरून हिंसाचार

Patil_p

मुसेवालाच्या हत्येत पुण्यातील शार्पशुटर्स

Patil_p

सेन्सेक्सची झेप 60,600 अंकांवर

Patil_p

दोन खलिस्तानी हस्तकांना पंजाबमध्ये अटक

Patil_p

कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यात वाढ

Patil_p

सिंधू, लक्ष्य सेन दुसऱया फेरीत

Patil_p