Tarun Bharat

कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला बेंगळुरात प्रारंभ

आयसीएमआर-भारत बायोटेकचा सहभाग

बेंगळूर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त सहभागातून आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या कोविड लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या हस्ते बुधवारी बेंगळूरमध्ये तिसऱया टप्प्यातील चाचणीला प्रारंभ करण्यात आला.

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत आयसीएमआर आणि भारत बायोटेक संस्थेने कोरोनावर कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे. या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी बेंगळूरमधील व्हाईटफिल्ड येथील वैदेही इस्पितळात सुरू झाली आहे. येडियुराप्पा यांनी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथून ऑनलाईनच्या माध्यमातून चाचणीचा शुभारंभ केला.

याप्रसंगी बोलताना त्यांनी,  बेंगळूरमधील इस्पितळात आत्मनिर्भर योजनेंतर्गत लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी होत आहे. स्वदेशी बनावटीच्या या लसीमुळे कोरोनाविरुद्धच्या लढय़ाला बळ मिळणार आहे. 1100 जणांवर चाचणी केली जाणार आहे. या चाचणीमध्ये युवकांनी स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Related Stories

सोमवारपर्यंत १ हजार बेडचे कोविड केअर सेंटर कार्यरत होणार

Archana Banage

कर्नाटकात सहावी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Archana Banage

अत्याचार प्रकरणी 12 आरोपींविरुद्ध 1,019 पानी चार्जशीट

Amit Kulkarni

सांगली जिल्हा हादरला; कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

Abhijeet Khandekar

कृष्णा-वारणेतून २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात

Archana Banage

मंगळूर : चर्चमध्ये दरोडा, तपास सुरू

Archana Banage