Tarun Bharat

कोव्हॅक्सिन लसीकरणासाठी योग्य जागा मिळेना

Advertisements

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

कोरोनावरील कोव्हॅक्सिनच्या लसिकरणासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दोन खोल्यांची गरज आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी सहकाऱयांसह योग्य जागेची पाहणी केली. शुक्रवारी सायंकाळी परिसराची पाहणी करूनही लसिकरणासाठी दोन खोल्या निश्चित करणे अवघड बनले. दरम्यान, कोव्हॅक्सिन ठेवण्यासाठी महाविद्यालयाच्या मेडिसीन स्टोअरमध्ये वॉकिंग कुलरची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.

सीपीआर हॉस्पिटल अद्यापी कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल आहे. नॉन कोरोना रुग्णांसाठी सीपीआर हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. कोरोना ओपीडीही सुरू आहे. कोरोनावरील कोव्हॅक्सिन जानेवारीच्या पहिल्या आठवडÎात सुमारे 29 हजार कोरोना योद्धÎांना दिले जाणार आहे. त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. कोव्हॅक्सिन लसिकरणासाठी दोन मोठ्या खोल्यांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने सायंकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी हॉस्पिटल परिसराची पाहणी केली. पण कोरोनासाठी आवश्यक गाईडलाईन्स पाहता परिसरात एकत्र अशा खोल्या निश्चित करता आलेल्या नाहीत. कोव्हॅक्सिन लसिकरणासाठी सीपीआरला जागा मिळेना, अशी स्थिती आहे.

सीपीआर परिसरात आता तिसरा वॉकिंग कुलर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इमारतीत वॉकिंग कुलर आहे. सीपीआर हॉस्पिटलमधील रेबीज आणि स्नेक बाईटस्वरील लसी तेथे ठेवल्या जातात. सीपीआर हॉस्पिटलच्या रक्तपेढीत दुसरा वॉकिंग कुलर आहे. त्याचा वापर रक्तघटक ठेवण्यासाठी केला जातो आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सीपीआरमधील औषध भांडारात तिसरा वॉकिंग कुलर उभारला जात आहे. त्यासाठी 10 लाख रूपये खर्च आला आहे. तसेच उणे 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात कुलरमध्ये कोव्हॅक्सिन ठेवली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक लसिकरणाला मंजुरी
सीपीआर हॉस्पिटलमध्ये क्रोम कंपनी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर 1700 कोरोना योद्धÎांना लस देण्यात येणार आहे. `भारत बायोटेक’च्या या लसीला आरोग्य विभागातील वरिष्ठांनी मंजुरी दिली आहे. तिसऱया टप्प्यात प्रायोगिक तत्वावर ही लस लवकरच येथे दिली जाणार आहे. त्यादृष्टीनेही सीपीआर प्रशासनाची तयारी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय स्टाफचे नियोजन केल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आले..

Related Stories

कोल्हापूर : आजारी साखर उद्योगाला ‘इथेनॉल’चा डोस

Abhijeet Shinde

घोडावत गूळ कारखान्याकडून ऊसाला प्रतिटन २८४० रुपये दर जाहीर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ाचा विकास आराखडा 581 कोटींचा

Abhijeet Shinde

पाचगावमधील व्यक्ती टिंबर मार्केट परिसरातील कोरोना मृत महिलेच्या संपर्कात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महाराष्ट्र हॉलीबॉल असोसिएशनची अधिकृत वेबसाईट सुरू करणार : विजय डांगरे

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तावडे हॉटेल महामार्ग वाहतूक सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!