Tarun Bharat

‘कोव्हॅक्सीन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

गृहमंत्री अनिल विज यांनी टोचून घेतली लस 

ऑनलाईन टीम / चंदीगढ : 

भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला आजपासून हरियाणात सुरुवात झाली. हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी स्वयंसेवक म्हणून कोव्हॅक्सीनची लस टोचून घेतली.

कोव्हॅक्सीनची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरल्यानंतर विज यांनी स्वयंसेवक म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत सर्व प्रथम लस टोचून घेऊ, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज लस टोचून घेतली. भारतातील 25 केंद्रांवर 26 हजार स्वयंसेवकांवर या लसीची ट्रायल घेण्यात येणार आहे. 

Related Stories

1 हजार महिलांकडून शिवतांडव पाठ

Patil_p

पाकिस्तानला ‘एफ-16’ पॅकेज, भारताचा आक्षेप

Patil_p

Kapil Sibbal : निवडणूक चिन्ह गोठवणे हे लोकशाही गोठवण्याची किंमत- कपिल सिब्बल

Abhijeet Khandekar

अमेरिका 8 देशांवरील प्रवासबंदी उठविणार

Patil_p

कोरोनावर उपचारासाठी फायझरने आणली Paxlovid गोळी

Archana Banage

देशात होतेय लॉकडाऊनची तयारी? केंद्रीय गृहमंत्री म्हणाले…

datta jadhav