Tarun Bharat

कोसबी पाणी योजना प्रकरणी तीन अभियंत्याना नोटीस

लाखोच्या योजनेचे तीनतेरा

प्रतिनिधी/ चिपळूण

लाखो रूपये खर्च करूनही तीनतेरा वाजलेल्या कोसबी पाणी योजना प्रकरणी  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने चिपळुणातील तत्कालीन 3 अभियंत्याना नोटीस पाठवण्यात आली आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर 15 दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी या योजनेची प्ग्नााहणी केली होती. दरम्यान, चिवेली ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचीही मंगळवारी लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांनी पाहणी केली.

   कोसबी येथील आठ वाडय़ांसाठी  40 लाखाहून अधिक खर्चाची पाणी योजना बारा वर्षापूर्वी करण्यात आली. मात्र मूळ अंदाजपत्रकानुसार या योजनेचे काम न झाल्याने पाईपलाईन, साठवण टाकी यासह अनेक त्रुटी असून योजनाच  अस्तित्वात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी गुहागर तालुक्यातील चौकशी अधिकारी नियुक्त केला. मात्र या चौकशी अधिकाऱयांकडूनही चालढकल करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांनी नव्याने दाखल झालेल्या डॉ. जाखड यांच्याकडे पुन्हा तक्रार करत न्याय देण्याची विनंती केली.

  पंधरा दिवसांपूर्वी सावर्डे येथे आलेल्या डॉ. जाखड यांनी तेथील कार्यक्रमानंतर थेट कोसबीत जाऊन या योजनेची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनीही दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यावर भ्रष्टाचार करणाऱयांवर कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. या योजनेप्रकरणी ग्रामीण पुरवठा योजनेच्या चिपळूण कार्यालयातील तत्कालीन उपअभियंत्यासह शाखा अभियंता असे तिघांना रत्नागिरीतील कार्यकारी अभियंत्यानी नोटीस पाठवत त्यांच्याकडे खुलासा मागवला आहे. यातील एक अभियंता निवृत्त झाला असून अन्य दोघे इतर जिल्हय़ात कार्यरत आहेत.

    एकीकडे मोठय़ा योजनेचा बट्टय़ाबोळ उडालेला असतानाच दुसरीकडे आपांगेवाडीतील ग्रामस्थांनी यशस्वीपणे राबवलेल्या खासगी योजनेचे भरभरून कौतुक केले होते. त्यांच्या भेटीनंतर अवघ्या पंधरा दिवसांतच या योजनेप्रकरणी कार्यवाही सुरू झाली आहे.

 चिवेली योजनेचीही चौकशी सुरू

कोसबीप्रमाणेच 2014-15 मध्ये करण्यात आलेल्या चिवेली पाणी योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. मंगळवारी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा खांडेकर, उपअभियंता यादव यांनी ग्रामस्थ मुबीन महालदार, समीर शिर्के, राजेंद्र शिर्के, दिलीप जाडे, सागर शिर्के, प्रकाश दणदणे, प्रसाद सुतार, सोहम मयेकर, महादेव शिर्के, संदेश शिर्के, यशवंत किजबिले, सिध्देश शिर्के, योगेश शिर्के यांच्यासह ठेकेदारांच्या उपस्थितीत शिर्केवाडी ते बौध्दवाडी  दरम्यानच्या कामाची पाहणी केली. यामध्ये जुनेच साहित्य वापरल्याचे दिसून आले. त्यामुळे या योजनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी तक्रारदारांनी केली आहे.

Related Stories

टेम्पो-रिक्षा अपघातात मच्छीविक्रेत्या महिलेचा मृत्यू

Patil_p

बचेंगे तो और भी लढेंगे – संजय राऊत

Abhijeet Khandekar

ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ल्यातील काही गावांना स्थलांतराच्या नोटीसा

Anuja Kudatarkar

मालवणच्या प्रवेशद्वारावर कसून तपासणी

NIKHIL_N

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूलचे यश

Anuja Kudatarkar

दोन वर्षांनंतर सिंधुदुर्ग कोरोनामुक्त

Anuja Kudatarkar