Tarun Bharat

कोसळलेल्या साटरे डोंगराची पाहणी

तज्ञसमितीकडून घटनास्थळी प्राथमिक अभ्यास : सरकारला लवकरच अहवाल सादर होणार

उदय सावंत/साटरे

 साटरे याठिकाणी मोठय़ा प्रमाणात डोंगराचे भूस्खलन झाले. या मागची कारणे शोधण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आलेले आहे. सरकारने नियुक्त केलेली वेगवेगळय़ा तज्ञांची समितीने नुकतीच घटनास्थळी भेट दिली .याभेटीदरम्यान सदर डोंगरावर 2006 साली प्रचंड प्रमाणात झालेली जंगलांची कत्तल व मोठय़ा प्रमाणात पर्जन्यवृष्टी यामुळेच डोंगराचे मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

 जवळपास 2 कि.मी डोंगर पूर्णपणे कोसळला असून यामुळे प्रचंड प्रमाणात जंगल संपत्तीची हानी झालेली आहे. यासंदर्भात अहवाल सरकारला सादर करण्यात येणार असून त्यानंतर उपाययोजना करण्यासंदर्भात सरकार विचार करणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. गोवा बायोडायव्हर्सिटी मंडळाचे प्रमुख प्रदीप सरमुकादम यांच्या नेतृत्वाखाली या समितीने कोसळलेल्या डोंगराची पाहणी केली. वेगवेगळय़ा स्तरावर फोटोग्राफ घेण्यात आलेले आहेत.

 जुलै महिन्यामध्ये अचानकपणे जवळपास 2 कि मी. डोंगर कोसळून जंगल संपत्तीची हानी झाली. गोव्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची हानी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारने याबाबत गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात तज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असून त्यानंतर याबाबतचा अहवाल सरकारला सादर केल्यानंतर उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी घोषित केले होते.

 हवामान बदल शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चतुर्वेदी भूगर्भशास्त्रज्ञ तथा दामोदर मंगलजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर, सहाय्यक उपवनपाल परेश परोब, म्हादई अभयारण्याचे परिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल, जलसिंचन खात्याचे सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे ,डॉ. मनोज बोरकर ,डॉ. मनोज इब्रामपूरकर, त्याचबरोबर भूगर्भशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ, हवामान बदल तज्ञ, पर्यावरण शास्त्रज्ञ, भूजल शास्त्रज्ञ सत्तरी तालुक्मयाची उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, वाळपई विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस व इतरांची खास उपस्थिती होती.

यावेळी यासमितीच्या पदाधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली व यासंदर्भात पाहणी केली. सध्या सदर भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे कोसळलेल्या मातीत  दलदल निर्माण झालेली आहे. यामुळे धोका निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे या समितीचे पदाधिकारी कोसळलेल्या डोंगराच्या टोकापर्यंत जाऊ शकले नाही. मात्र आवश्यक स्वरूपात अभ्यासासाठी विविध स्तरावर माहिती घेण्यात आलेली आहे.

1863 साली ला?पिस मेंडिस यापोर्तुगीज अधिकाऱयांनी सदर ठिकाणी भेट दिली होती. ज्वालामुखी होऊन “आंब्याचे गवळ”  या प्रदेशाची निर्मिती झाली . या संदर्भाचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. सदर ठिकाणी गाव होता व त्याठिकाणी मानववस्ती होती. महत्त्वाचे म्हणजे सदर गावामध्ये शुक्रवारी बाजार भरत होता.  या बाजाराला नगरगाव व सावर्डे पंचायत क्षेत्रातील नागरिक मोठय़ा प्रमाणात जात होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

2006 साली जंगलाची अपरिमित हानी

दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार 2006 साली कर्नाटकाच्या बाजूने सदर भागांमध्ये प्रचंड प्रमाणात जंगलतोडीच प्रकार घडला होता. याबाबतच्या तक्रारी करून सुद्धा त्याकडे मोठय़ा प्रमाणात लक्ष देण्यात आले नाही .सध्या मोठय़ा प्रमाणात  पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे भूस्खलन  सारखा प्रकार घडल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.

Related Stories

ओमिक्रॉन डेल्टासारखा प्राणघातक विषाणू नव्हे : डॉ. व्यंकटेश हेगडे

Amit Kulkarni

खंडणीप्रकरणी धर्मेश सगलानीला अटक

Amit Kulkarni

वेगवेगळय़ा दोन अपघातात दोन युवक ठार

Patil_p

पिसुर्ले खनिज खंदकात पाणी वाढतेय

Amit Kulkarni

काणकोणात इच्छुक उमेदवारांकडून लोकसंपर्कावर भर

Patil_p

भारतरंग महोत्सवात गोव्यातील दोन नाटके

Amit Kulkarni