प्रतिनिधी/ रत्नागिरी
भारतीय कोस्टगार्ड येथे नोकरीचे आमिष दाखवून जिल्हय़ातील 200 हून अधिक तरूणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े प्रत्येक तरूणाकडून सुमारे 50 हजार रूपये व त्यापेक्षा अधिक रक्कम घेण्यात आली होत़ी त्यानुसार 65 लाख रूपयांहून मोठा आर्थिक फसवणुकीचा प्रकार आह़े या प्रकरणी पोलिसांनी शहरातील भाटय़े येथील संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
मुनाफ अब्दुल रज्जाक भाटकर (ऱा भाटय़े-रत्नागिरी) असे फसवणूक करणाऱया संशयिताचे नाव आह़े या प्रकरणी लांजा-वाकेड येथील विशाल सुभाष गुरव यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनाफ भाटकर हा बेराजगार तरूणांना भारतीय कोस्टगार्ड रत्नागिरी येथे नाविक, जनरल डय़ुटी, ड्रायव्हर अशा पदांवर नोकरी लावतो, असे आमिष दाखवत होत़ा त्यासाठी आपली कोस्टगार्ड येथील बडय़ा अधिकाऱयांशी ओळख असल्याची बतावणी त्याने केली होत़ी
मुनाफकडून तरूणांना उडवाउडवीची उत्तरे
कोस्टगार्ड येथे नोकरीसाठी पदाप्रमाणे 50 हजार अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागेल, असे मुनाफ यांने सांगितल़े नोकरीच्या लोभापोटी सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुनाफ याने 200 हून अधिक तरूणांकडून लाखो रूपये उकळल़े पैसे देवूनही नोकरी मिळत नसल्याने तरूणांकडून नोकरीसाठी मुनाफ याच्याकडे तगादा लावण्यात आल़ा यावेळी मुनाफ हा उडवाउडवीची उत्तरे तरूणांना देत होत़ा तसेच तो कोरोना काळाचेही कारण पुढे करत होत़ा
..अन् फसगतीच्या खात्रीनंतर पोलिसांत धाव
नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे तरूणांच्या लक्षात आल़े या बाबत त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून कारवाई करण्यासंबधी विनंती केल़ी या प्रकरणी लांजा-वाकेड येथील विशाल गुरव याने शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी मुनाफ याच्याविरूद्ध भादंवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आह़े या गुह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आह़े