Tarun Bharat

कौंटी सिलेक्ट संघाचे नेतृत्व ऱहोड्सकडे

वृत्तसंस्था/ डय़ुरहॅम

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचा मुक्काम सध्या इंग्लंडमध्ये आहे. यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका ऑगस्ट महिन्यात खेळविली जाणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा तीन दिवसांचा सरावाचा सामना 20 ते 22 जुलै दरम्यान खेळविला जाणार आहे. कौंटी सिलेक्ट इलेव्हन आणि भारत यांच्यातील हा सामना रिव्हरसाईड मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी वॉर्विकशायर संघाचा कर्णधार विल्पेड ऱहोड्सकडे कौंटी सिलेक्ट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

इंग्लंडमध्ये कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाला कंबाईंड कौंटीज संघ म्हणून संबोधले जाते. इंग्लंडच्या दौऱयावर येणाऱया विदेशी संघांचा पहिला प्रथमश्रेणी सरावाचा सामना नेहमी कौंटी सिलेक्ट संघाबरोबर आयोजित केला जातो. 20 जुलैपासून खेळविला जाणारा हा तीन दिवसांचा सरावाचा सामना बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविण्यात येईल. कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघामध्ये जेम्स ब्रेसी तसेच सलामीचा फलंदाज हशीब हमीद यांचा समावेश आहे. हा सरावाचा सामना सुरू होण्यापूर्वी कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघातील प्रत्येक खेळाडूची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे.

Related Stories

मल्ल नरसिंग यादव सर्बियातील स्पर्धेसाठी सज्ज

Patil_p

आणखी 3-4 वर्षे खेळण्याचा कार्तिकचा मानस

Patil_p

हॅट्ट्रिक पराभवातून सावरण्याचे केकेआरसमोर आव्हान

Patil_p

ब्राझिलियन फुटबॉलपटू काकाचे मॅरेथॉनमध्ये पदार्पण

Patil_p

माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये वाढ! BCCI ची मोठी घोषणा

Abhijeet Khandekar

ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिकेत विजयी आघाडी

Amit Kulkarni