ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतेच तिचे आत्मचरित्र ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक अमेरिकेत प्रकाशित केले आणि अवघ्या 12 तासांत त्याची सर्वाधिक विक्री झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या ‘बेस्टसेलर’ पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाचा समावेश झाला आहे. प्रियांकाने हे पुस्तक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.


12 तासांपेक्षा कमी वेळात अमेरिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. मला आशा आहे की, तुम्हा सगळ्यांना हे पुस्तक खूप आवडेल’, असे म्हणत प्रियांकाने आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘टॉप 10’ पुस्तकांची यादी शेअर करत तिने ही गुडन्यूज आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
या बद्दल सांगताना ती म्हणते, ‘गेली 20 वर्ष इंडस्ट्रीत काम करताना माझ्याकडे एक भली मोठी यादी तयार झाली होती. ही यादी मला वैयक्तिक आणि प्रोफेशनली या दोन्ही बाजूंनी तपासायची होती. आणि म्हणूनच मी अजूनही स्वतःला ‘अनफिनिश्ड’ (अपूर्ण) समजते. म्हणून या पुस्तकाचे नाव देखील ‘अनफिनिश्ड’ आहे.’
हे पुस्तक लिहिताना मला जाणवले की ‘अनफिनिश्ड’ चा अर्थ माझ्यासाठी खूप खोल आहे. उलट यामध्ये माझ्या आयुष्यातील सगळ्या सामान्य गोष्टी आहेत.