नसीरुद्दीन शाह, लारा दत्ता, सोहा अली खान एकत्र


ओटीटी कंटेंट निर्मितीच्या क्षेत्रात एका नव्या भागीदारीची घोषणा झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 ने अप्लॉज एंटरटेनमेंट, एमे एंटरटेनमेंट आणि आयपी स्टुडियो यांच्याशी हातमिळवणी केली आहे. तसेच या भागीदारीचा पहिला प्रोजेक्ट ‘कौन बनेगी शिखरवती’ ची घोषणा करण्यात आली आहे.
या कॉमेडी वेबसीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह आणि रघुवीर यादव यांच्यासह लारा दत्ता, सारा अली खान, कृतिका कामरा, अन्या सिंह, सायरस साहूकार, वरुण ठाकूर आणि अनुराग सिन्हा मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. या शोचे दिग्दर्शन गौरव चावला आणि अनन्या बॅनर्जी यांनी केले आहे.
कौन बनेगी शिखरवतीची कहाणी एका राजघराण्याच्या सदस्यांच्या बिघडलेल्या संबंधांवर आधारित आहे. यात नसीरुद्दीन हे एका राजाची भूमिका साकारत आहेत. तर लारा, सोहा, कृतिक आणि अन्या सिंह त्यांच्या मुलींची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येतील. ही वेबसीरिज जानेवारीमध्ये झी5 वर स्ट्रीम होणार आहे.