Tarun Bharat

क्रांतिज्योती सावित्रीची लेक पुरस्काराचे वितरण

महिला विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापिका यांचा सन्मान

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने ‘क्रांतिज्योती सावित्रीची लेक 2022′ पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यस्थानी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती रसिका पाटील होत्या. एक महिला विस्तार अधिकारी, दोन महिला केंद्र प्रमुख आणि बेचाळीस मुख्याध्यापिकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. फुले दांपत्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे नेण्याची, जपण्याची जबाबदारी समाजाची आहे. प्रमुख पाहुण्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे म्हणाल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. पुरस्कार प्राप्त सर्व मुख्याध्यापिकांचा सन्मान करताना मला अभिमान वाटतो. अध्यक्षस्थानावरून बोलताना रसिका पाटील म्हणाल्या, संघटनेचे शैक्षणिक व सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. महिलांचा सन्मान करून त्यांना पुढील कामास प्रोत्साहन दिले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी विद्या चौगले, संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, जिल्हाध्यक्ष एस के पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविक महिला जिल्हा सरचिटणीस अलका थोरात यांनी केले. सुत्रसंचालन महिला उपाध्यक्षा शोभा पाटील व अशोक खाडे यांनी केले. आभार मनिषा गुरव यांनी मानले. यावेळी एस. के. पाटील, शंकर पवार, दिलीप भोई, पी. आर. पाटील, सुनिल पोवार, अशोक शिवणे, तानाजी पावले, रंगराव वाडकर, दिगंबर टिपुगडे, प्रमिला माने, मालती राजमाने, प्रेरणा चौगुले, राजश्री पिंगळे, वृषाली पाटील, विलास पिंगळे आदी उपस्थित होते.

Related Stories

पैजारवाडी येथे ट्रकची एसटीला धडक; चालकासह सहा जखमी

Kalyani Amanagi

चोवीस वर्षे फरार आरोपीस अटक करण्यात शिरोळ पोलीसांना यश

Archana Banage

पक्षाची भूमिका बदलणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

Archana Banage

धक्कादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 9518 कोरोना रुग्ण; 258 मृत्यू

Tousif Mujawar

रुपाली चाकणकर पक्ष सोडून जाणार होत्या मी त्यांना थांबवल- चित्रा वाघ

Archana Banage

नवीन नकाशाबाबत नेपाळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आज मतदान

datta jadhav