कोल्हापूर प्रतिनिधी
गिरगाव व परिसरामध्ये ऊस तोडणी करण्यासाठी बीड परभणी भागातून आलेल्या ऊस तोडणी मजुरांना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्थेमार्फत चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. गिरगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील यांच्यासह अन्य सदस्यांच्या हस्ते या चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
ऊस तोडत असताना कित्येकदा उसाचे पान लागून किंवा मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्यावर उसाचे खोडवे डोळ्याला लागल्याने कित्येक ऊसतोडणी मजूरांना डोळ्याला इजा होऊन डोळा गमवावा लागला आहे. मजूरांच्याकडून सुरक्षित साधनांचा वापर केला जात नाही व मजुरांच्या डोळ्यांना गंभीर इजा होते. अशीच एक घटना गिरगाव येथे आलेल्या टोळीतील एका मजुराच्या बाबतीत घडली. ही बातमी फिरंगोजी शिंदे संस्थेला समजताच अशी घटना परत घडू नये यासाठी त्या ऊस तोड कामगारांच्यासाठी हा उपक्रम राबवण्याचे ठरवत या मंजुरांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या संस्थेमार्फत सामाजिक, आरोग्य विषयक, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, महिला सबलीकरण असे 50 हून अधिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
यावेळी फिरंगोजी शिंदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील, अनंतशांती संस्थेचे भगवान गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, विश्वास पाटील, लखन गुरव, आशिष नावलकर, प्रकाश पाटील, शिवाजी कोंडेकर, शितल पाटील, सानिका जाधव, सानिका पाटील, लक्ष्मी पाटील, करण देसाई, अनुज पाटील यांच्यासह फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडय़ाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


next post