Tarun Bharat

क्रिकेटर हरभजन सिंह – गीता बसराच्या घरी पाहुण्याचे आगमन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह आणि गीता बसराच्या घरी पाहुण्याचे आगमन झाले आहे. हरभजन सिंहने स्वतः ट्वीट करत मुलगा झाला असल्याची माहिती दिली. मुलगा झाल्याची बातमी कळताच हरभजन आणि गीता बसरावर शुभेच्छांचा वर्षाव केला जाऊ लागला आहे.


गीता बसराने मार्च महिन्यातच आपल्या प्रेग्नंसीबद्दल माहिती दिली होती. तिने त्यावेळी जे फोटो शेअर केले आहेत त्यात हरभजन आणि त्यांची मुलगी दिसले होते. हरभजन आणि गीता बसरा यांची एक पाच वर्षाची मुलगी आहे,  हिनाया असे तिचे नाव आहे. 


गीता बसरा हीचा जन्म ब्रिटनमध्ये झाला आहे. 2006 मध्ये तिने इमरान हाशमीसोबत ‘दिल दिया है’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. त्यानंतर ‘द ट्रेन’ मध्येही ती दिसली. हरभजन आणि गीता आपल्या एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. काही दिवस डेट केल्यानंतर 2015 मध्ये दोघांनी लग्न केले. 

Related Stories

बेलारुसची साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स, एक्सेस इलाईट हुबळी संघ विजयी

Omkar B

आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात

Patil_p

तामिळनाडू- बडोदा यांच्यात आज जेतेपदासाठी लढत

Patil_p

देवेंद्र झाझरियाला पद्मभूषण, नीरज चोप्रा, शंखवाळकरांना पद्मश्री

Patil_p

भारत-इंग्लंड महिला संघात आज लढत

Patil_p