Tarun Bharat

क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघासाठी मानसोपचार तज्ञ नेमणार

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

ऑस्ट्रेलियन संघातील क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रथमच व्यावसायिक मानसोपचार तज्ञाची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. संघातील तीन क्रिकेटपटूंच्या मानसिकतेत सुधारणा घडविण्याकरिता ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याची गेल्यावर्षी मानसिक स्थिती अस्थिर झाल्याने त्याची कामगिरी चांगली होवू शकली नव्हती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवडय़ात आपल्या वेबसाईटवर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या नव्या पदामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची मानसिक स्थिती अधिक भक्कम होण्यास मदत होईल, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे सध्या दोन क्रीडा मानसोपचार तज्ञ व्यक्ती आहेत. मिचेल लॉईडकडे पुरूष संघाची तर पीटर क्लार्ककडे महिला संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्यावर्षी अष्टपैलू मॅक्सवेलची मानसिक स्थिती नाजूक झाल्याने त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नव्हते. मॅक्सवेलने स्वत:हून काही कालावधीसाठी क्रिकेटपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. सातत्याने क्रिकेट खेळण्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेल, मॅडिन्सन आणि पुकोव्हस्की या तीन क्रिकेटपटूंवर बरेच मानसिक दडपण आल्याने त्यांच्या कामगिरीवर विपरित परिणाम होत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला जाणवले होते.

Related Stories

आयपीएल स्पर्धा जुन्या पद्धतीप्रमाणे खेळविणार

Amit Kulkarni

इंग्लंडच्या अष्टपैलू लिव्हिंगस्टोनला दुखापत

Patil_p

फिलिपाईन्सचा बाद फेरीत प्रवेश, ऑस्ट्रेलिया विजयी

Patil_p

हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक रीड यांचा राजीनामा

Patil_p

भारताची टी-20 मालिकेत बरोबरी

Patil_p

विजेंदरची पुढील लढत गोव्यात…ती ही थेट कॅसिनोवर!

Patil_p