Tarun Bharat

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संचालकपदी ग्रीम स्मिथ

Advertisements

कसोटी कर्णधारपद डी कॉकला न देण्याचे मत

जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था

द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथची क्रिकेट द. आफ्रिकेच्या संचालकपदी  दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. द. आफ्रिका वनडे व टी-20 संघाचा कर्णधार क्विन्टॉन डी कॉककडे कसोटी कर्णधारपद न देण्याचा विचार स्मिथने बोलून दाखविला. 

 39 वर्षीय ग्रीम  स्मिथने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत विक्रमी 108 कसोटी सामन्यात द. आफ्रिका संघाचे नेतृत्व केले असून त्याने 149 वनडे सामन्यातही द. आफ्रिका संघाचे कर्णधारपद भूषविले होते.  2005-06 साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ग्रीम स्मिथने  विश्व इलेव्हन संघाचे नेतृत्व केले होते.  द. आफ्रिका क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी  आता ग्रीम स्मिथ महत्वाचे निर्णय घेणार आहे. गेल्या डिसेंबरपासून क्रिकेट द. आफ्रिकेच्या संचालकपदी स्मिथची अंतरिम पद्धतीनुसार निवड केली होती. आता त्यांची दोन वर्षांच्या कालावधीकरिता क्रिकेट द. आफ्रिकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

द.आफ्रिका कसोटी संघाचे नेतृत्व डी कॉककडे दिले जाऊ नये, असे स्मिथला वाटते. त्याच्याकडे सध्या वनडे व टी-20 संघांचे नेतृत्व असून यष्टिरक्षणाची जबाबदारीही त्याला सांभाळावी लागते. तिन्ही संघांचे नेतृत्व करताना काय अडचणी येतात, याची मला जाणीव आहे. त्यामुळे डी कॉक कसोटीसाठी प्रेश रहावा, त्याच्यावर अधिक ताण पडू नये, यासाठी त्याच्याकडे कसोटीचे नेतृत्व सोपविले जाणार नाही, असे स्मिथने स्पष्ट केले.

जागतिक स्तरावर पसरलेल्या कोरोना व्हायरस महामारीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून त्याला क्रिकेटही अपवाद नाही. क्रिकेट द. आफ्रिकेच्या  संचालकपदी नियुक्त केलेल्या ग्रीम स्मिथचा संचालकपदाचा कालावधी मार्च 2022 मध्ये समाप्त होईल, अशी माहिती क्रिकेट द. आफ्रिकेचे  प्रमुख कार्यकारी जॅक्वीस फौल यानी दिली. येत्या जुलैमध्ये द. आफ्रिका आणि विंडीज यांच्यात कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. तसेच वनडे मालिकेसाठी द.आफ्रिका संघ जूनमध्ये लंका दौराही करणार आहे. मात्र हे दोन्ही दौरे रद्द होण्याची शक्यता आहे. द. आफ्रिका संघाची अलिकडच्या कालावधीतील कामगिरी  फारशी समाधानकारक झाली नसल्याने हा संघ पूर्वीसारखा बलवान बनविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील असे स्मिथने सांगितले. 2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत द. आफ्रिका संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी मार्क बाऊचरची नियुक्ती करण्याचा निर्णय स्मिथने घेतला आहे.

Related Stories

‘तो’ निर्णय निवडकर्त्यांचा : अध्यक्ष सौरभ गांगुली

Amit Kulkarni

आयपीएलमध्ये आता खेळणार 10 संघ ; बीसीसीआयचा निर्णय

Tousif Mujawar

कोनेरु हंपीला 12 वे स्थान

Patil_p

अखेरच्या सामन्यातही भारतीय महिलांची बाजी

Patil_p

रास दांडिया मध्येही थिरकली तरुणाई

mithun mane

युपी योद्धाकडून दबंग दिल्ली पराभूत

Patil_p
error: Content is protected !!