Tarun Bharat

क्रिमिनल केसेसमध्ये कोणालाही इम्युनिटी नसते

ऑनलाईन टीम / मुंबई :

देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेली नोटीस ही आरोपी म्हणून नव्हे तर जबाब नोंदवण्यासाठी होती. राज्य गुप्तवार्ता विभागात चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती कुठून मिळाली, हेच पोलिसांना जाणून घ्यायचे होते. त्यांना अडचणीत आणण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. क्रिमिनल केसेसमध्ये कोणालाही इम्युनिटी नसते. कारण मीही थोडा कायदा शिकलो आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सभागृहात स्पष्ट केले.

फडणवीस यांनी राज्यात झालेल्या पोलिसांच्या बदल्यांमधील महाघोटाळा उघड केला. त्यासाठी कोणत्या स्रोतांचा वापर पेला, यासाठी पोलिसांनी काल फडणवीसांची चौकशी केली. त्यावेळी फडणवीस यांनी माहितीचा स्रोत उघड करणे मला बंधनकारक नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मला काही विशेष अधिकार आहेत, असा दावा केला. त्याला आज वळसे-पाटील यांनी सभागृहात प्रत्युत्तर दिले.

वळसे-पाटील म्हणाले, राज्य विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्याने फडणवीस यांचा जबाब घेणे गरजेचे होते. फडणवीस यांना 6 वेळा नोटीस पाठवण्यात आली. त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा अर्थ समन्स असा होत नाही. फडणवीस यांनी काही बदल्यांबाबतची माहिती समोर आणली, त्याबाबत माहिती घ्यायची होती. त्यांना याआधी देखील दोनदा प्रश्नावली पाठवण्यात आली आहे. पोलीस बदली घोटाळा प्रकरणाची माहिती लीक झाल्याप्रकरणी फडणवीस यांची चौकशी सुरु आहे. माझ्याकडे असणाऱया माहितीत फरक असेल. पण क्रिमिनल केसेसमध्ये कोणालाही इम्युनिटी नसते, असे सांगत दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसचे समर्थन केले.

Related Stories

रेल्वेस्थानक ते सांबरा विमानतळ बससेवेला प्रारंभ

Rohit Salunke

मिनीबस नदीत कोसळली; 5 ठार

Patil_p

1 एप्रिलपासून तब्बल 800 औषधं महागणार

datta jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्राला संबोधित करणार

datta jadhav

ऑगस्टमध्ये सरकारी तिजोरीत 1.12 लाख कोटी

datta jadhav

कोरोनामुळे जागतिक अन्न आणीबाणी उद्भवण्याची शक्यता

datta jadhav