Tarun Bharat

क्रीडा विषयाचा समावेश दिक्षा ऍपमध्ये होणार

वृत्तसंस्था/ मुंबई

कोरोना सारख्या विचीत्र परिस्थितीला जग सामोरे जात असताना रोगप्रतिकारक शक्ती माणसाला तारते आहे. ही रोगप्रतीकारक शक्ती योगा, प्राणायम, सूर्यनमस्कार, एरोबिक्स तसेच इतर व्यायाम प्रकारातून निर्माण होते. या सर्व बाबी शारीरिक शिक्षणात येत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षणातील तंत्रशुद्ध व्यायाम प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक, पालक व समाजासाठी अत्यंत महत्वाची व रोगप्रतीकारक क्षमता वाढविण्यासाठी महत्वाची आहे. शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलने तयार केलेले ई कंटेंट हे दिक्षा ऍप व जिओ टीव्ही चॅनलवर घेण्यात येऊन सर्वांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शासन घेईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक तथा शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलं द्वारा निर्मीत शारीरिक शिक्षण ई कंटेंटच्या शुभारंभ दिनकर पाटील यांच्या शुभहस्ते झाला त्या प्रसंगी ते बोलत होते. शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त यांनी शारीरिक शिक्षण आणि खेळ यांची सांगड घालून सुदृढ व हेल्थी समाज निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमातून शासनाचा क्रीडा विभाग कार्यरत असल्याचे मत व्यक्त केले व तंत्रस्नेही पॅनलच्या कार्याचे कौतुक केले. तर शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागात समन्वय राहिल्यास भारताचा आधारस्तंभ असलेला विद्यार्थी सुदृढ झाला तर कोरोना सारख्या कितीतरी महामारीला तो पळवून लावेल असे मत सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी व्यक्त केले.

Related Stories

५० मीटर रायफल प्रोनमध्ये तेजस्विनी सावंत, पुष्कराज इंगोले यांना सुवर्णपदक

datta jadhav

चेन्नई संघाच्या सराव शिबिरात रैना, जडेजा दाखल

Patil_p

नेदरलँड्स हॉकी संघाचे भुवनेश्वरमध्ये आगमन

Patil_p

उन्नती हुडा, किरण जॉर्ज बॅडमिंटन विजेते

Patil_p

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

Patil_p

नदाल, जोकोविच, मेदवेदेव्ह दुसऱया फेरीत

Patil_p