Tarun Bharat

“क्रूझ पार्टीत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाचे वानखेडेंशी संबंध”; नवाब मलिकांचा आणखी एक आरोप

मुंबई/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक आणि आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मालिकांनी समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी (international drug mafia) संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत घेत वानखेडे, के.पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडेंच्या चालकाच्या सीडीआर तपासणीची मागणी केली आहे. इलेक्ट्रॉनिक तपास झाल्यास काही शंका राहणार नाही, असं मलिक यांचं मत आहे. तसेच मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये (cruise drug party) एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसह सहभागी होता असा आरोप मलिक यांनी केलाय. यासंदर्भात बोलताना मलिक यांनी ही ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती.

कोविड प्रोटोकॉल असूनही महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती, पोलिसांना या पार्टीची माहिती देण्यात आली नव्हती. गृहविभागालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. या पार्टीत लक्ष्य करण्यात आलेल्या लोकांचे फोटो देऊन त्यांना अडकवण्यात आलं. पण माझ्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे NCB च्या सर्वांना माहित आहे. तसेच एनसीबीने क्रूझवरील सीसीटीव्ही फुटेज पहावे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की गोव्यातही त्यांचं मोठं रॅकेट आहे. त्यामुळे एनसीबीने या प्रकरणाची दाखल घ्यावी आणि चौकशी करावी.

जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कारवाई किंवा छापा टाकण्याची वेळ येत होती, तेव्हा वानखेडे कायमच छापेमारी टाळत आले. त्यांच्या चौकशीसाठी NCB मुख्यालयातून जे लोक आलेत, त्यांच्याकडे मी मागणी करतो की त्यांनी क्रूझवरचं सीसीटीव्ही फुटेज तपासावं, प्रत्येक खोलीतलं फुटेज पाहावं. डान्सचं फुटेजही पाहावं. त्यानंतर जगातला एक मोठा ड्रग्जमाफिया तुम्हाला सापडेल. ही पार्टी त्यानेच आयोजित केली होती.

Related Stories

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Archana Banage

‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन संशयितांची जामिनावर सुटका

datta jadhav

सदरबाजार येथील बीफ विक्री करणारे हॉटेल्स सील

Patil_p

जिह्यात पोस्ट बॅकेकडून 15 कोटीचे वाटप

Patil_p

‘आयटी एक्स्पो’ प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Abhijeet Khandekar

वाठार स्टेशनचे जवान विशाल पवार अनंतात विलीन

Patil_p