Tarun Bharat

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीणने 60,000 नवे कर्जदार जोडले

नवी दिल्ली

 लघु स्वरूपाचे कर्जपुरवठा उपलब्ध करून देणाऱया अनेक कंपन्यांपैकी क्रेडिट  ऍक्सेस ग्रामीण यांच्याकडून ग्रामीण भागासाठी कर्ज वितरण करण्यात येते. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात जवळपास 60,000 नवीन कर्जदार कंपनीने जोडले आहेत. मागील महिन्याच्या दरम्यान कंपनीने 1,505 कोटी रुपयांचे कर्ज वितरणासोबत कोरोना विषाणूच्या अगोदरची स्थिती प्राप्त केली. क्रेडिट ऍक्सेसकडून ग्रामीण ग्राहकांमधील विश्वास संपादन केला असून याच मदतीने कंपनीने मजबूत व्यवसाय वृद्धींगत केला आहे. कंपनीने ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान 1,371 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले होते. यासोबतच नोव्हेंबरमध्ये 59,930 नवीन तर ऑक्टोबर महिन्यात 55,581 जणांना कर्ज वितरण केले आहे.

Related Stories

टोयोटा किर्लोस्कर मोटरतर्फे लेजेंडर व्हेरियंट

Patil_p

‘टाटा समूहा’ला विस्ताराचे वेध!

Omkar B

शेअर बाजारासह म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक तेजीत

Patil_p

सेन्सेक्स 627 अंकांनी घसरला

Patil_p

औषध-बँकिंगमधील विक्रीचा बाजाराला फटका

Patil_p

दर मिनिटाला लाखाहून अधिक सायबर हल्ले

Patil_p